बॉलिवूडचे कनेक्शन असलेले चौथे सेक्स रॅकेट उध्वस्त; पुण्याच्या महाविद्यालयातील मुलींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 02:43 PM2020-01-21T14:43:51+5:302020-01-21T14:55:27+5:30

या सेक्स रॅकेटचे देखील बॉलिवूड कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Fourth sex racket with Bollywood connection busted; Pune college girls rescued by SS branch | बॉलिवूडचे कनेक्शन असलेले चौथे सेक्स रॅकेट उध्वस्त; पुण्याच्या महाविद्यालयातील मुलींची सुटका

बॉलिवूडचे कनेक्शन असलेले चौथे सेक्स रॅकेट उध्वस्त; पुण्याच्या महाविद्यालयातील मुलींची सुटका

googlenewsNext
ठळक मुद्देयाप्रकरणी नावेद शरीफ अहमद अखतर (२६) या प्रोडक्शन मॅनेजर आणि नावीद सादीक सय्यद (२२) या कास्टिंग डायरेक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन मुली स्टुडंड व्हिसावर पुण्याच्या महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. महिला साथीदार दलालाचा शोध पोलिस घेत आहेत. 

मुंबई - २० जानेवारी रोजी अनैतिक मानची वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या समाजसेवा शाखेच्या पथकास विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंधेरी पूर्व येथील इम्पिरियल पॅलेस हॉटेल थ्री स्टार हॉटेलमध्ये छापा टाकून ३ मुलींची सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी दोन मुली स्टुडंड व्हिसावर पुण्याच्या महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. तर या सेक्स रॅकेटचे देखील बॉलिवूड कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी नावेद शरीफ अहमद अखतर (२६) या प्रोडक्शन मॅनेजर आणि नावीद सादीक सय्यद (२२) या कास्टिंग डायरेक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नावेद शरीफ अहमद अखतर (२६) या प्रोडक्शन मॅनेजर आणि नावीद सादीक सय्यद (२२) या कास्टिंग डायरेक्टर दोघेही बॉलिवूडशी संबंधित असून ते वेश्याव्यवसायाकरिता मॉडेल आणि परदेशी मुली पुरवित असल्याची तसेच एका मुलीकरीता प्रत्येकी ४० हजार रुपये पैसे घेत असल्याची खात्रीलायक माहिती समाजसेवा शाखेला प्राप्त झाली होती. या माहितीच्या अनुषंगाने काल समाजसेवा शाखेच्या पथकाने बोगस गिऱ्हाईक पाठवून वेश्या व्यवसाय चालविणारा दलाल नावेद याच्याशी संपर्क साधून अंधेरी पूर्व येथील इम्पिरियल पॅलेस हॉटेल या थ्री स्टार हॉटेलमध्ये छापा टाकून केलेल्या कारवाईत ३ पीडित मुलींची सुटका करण्यात आली. त्यापैकी दोन मुली या तुर्कमेनिस्तान या देशाच्या नागरिक असल्याये निष्पन्न झाले असून त्या दोषी स्टुडंट व्हिसावर शिक्षणाकरीता भारतात आल्या असून सध्या त्या पुणे येथील महाविद्यालयात कला शाखेत शिक्षण घेत आहेत. यापूर्वी नमुद परदेशी मुली मुंबईत शुटींगकरीता आल्या असताना त्याची ओळख आरोपीसोबत झाली होती. त्या ओळखीचा फायदा घेवुन बॉलीवुडमध्ये काम पाहिजे असल्यास त्याआधी तडजोड करावी लागेल तसेच एका बँडच्या जाहिरातीचे शुट असून त्याकरिता परदेशी मुलांची आवश्यकता असल्याचे सांगून त्याकारीता शरीरसंबंध ठेवावे लागतील असे दलालांनी पीडित मुलींना सांगितले.  हॉटेलमधील धाडीत सापडलेल्या भारतीय मुलीकडे चौीकशी केली असता तिने नमुद गुन्हयातील पाहिजे आरोपी दलाल महिलेने नमूद गुन्हयातील अटक आरोपी नावेद याच्या ओळखीने  तिला वेश्या व्यवसायासाठी या हॉटेलमध्ये पाठविल्याचे सांगितले. तसेच ही दलाल महिला तिच्या वर्सोवा येथील घरात दोन मुलींना वेश्या व्यवसायासाठी ठेवून त्या देखील पुरवत असल्याची अधिक माहिती पोलिसांना भारतीय मुलीने दिली.

अंधेरी पोलीस ठाणे येथे भा.दं. वि. तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदयाच्या कलमान्यये गुन्हा नोंद करण्यात आला असून नमुद गुन्हयात बॉलीवूडमध्ये काम देण्याचे आमीष दाखवून सेक्स रॅकेट चालविणारे दलाल नावेद शरीफ अहमद अख्तर (२६) आणि नाबीद सादीक सय्यद (२२) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून महिला साथीदार दलालाचा शोध पोलिस घेत आहेत. 


 

पोलिसांनी उघड केलेली मागील तीन सेक्स रॅकेटचा प्रकरणे
३ जानेवारी २०२० रोजी जुहू परिसरातील झेड लक्झरी रेसीडेन्सी या तारांकित हॉटेलमध्ये छापा टाकून उझबेकीस्तान देशाच्या २ पीडित मुलीची सुटका करण्यात आली होती. बॉलीवूडमधील कास्टिंग डायरेक्ट राजेश कुमार कामेश्वर लाल याला या गुन्हयात अटक करण्यात आली.

१४ जानेवारी २०२० रोजी कॅफे कॉफी हे जे.पी.रोड, ७ बंगला, वर्सोवा, अंधेरी याठिकाणी सापळा रचून २ पीडित मुलीची सुटका करण्यात आली होती. या मुलींनी हिंदी चित्रपटामध्ये ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून तर बॉलीवुडमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून म्हणून काम केले आहे. या प्रकरणी बॉलीवुडमध्ये कास्टींग डायरेक्टर म्हणून काम करणारा दलाल नविनकुमार प्रेमलाल आर्या (३२) यास अटक करण्यात आली.

१६ जानेवारी २०२० रोजी अंधेरी येथील इंगनफ्लाय हॉटेल या थ्री स्टार हॉटेलमध्ये छापा टाकून केलेल्या कारवाईत ३ पीडित मुलींची सुटका करण्यात आली. मुलगी अल्पवयीन होती व तिने वेब सिरीजमध्ये काम केलेले असून दुसऱ्या मुलीने एका मराठी टिव्ही सिरियलमध्ये छोटीशी भूमिका केली आहे. तर तिसऱ्या मुलीने सावधान इंडिया या टिव्हीवरील मालिकेमध्ये काम केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. या कारवाईमध्ये महिला दलालास अटक करण्यात आली.

Web Title: Fourth sex racket with Bollywood connection busted; Pune college girls rescued by SS branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.