हांसी- हरियाणाच्या हांसीमध्ये बालविवाह, बलात्कार आणि हुंडयासाठी छळाचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात वयाच्या १५ व्या वर्षी बालविवाहाचा बळी ठरलेल्या अल्पवयीन मुलीने तिच्या पतीवर तब्बल ४ वर्षांनी बलात्कार आणि हुंडा मागितल्याचा आरोप केला आहे. हुंडाबळीचा त्रास आणि बालविवाहाच्या संदर्भात कारवाई करत महिला पोलिस स्टेशनने मुलाच्या आई-वडिलांसह इतर दोन जणांना अटक केली.सदर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत महिलेने सांगितले होते की, तिचे लग्न जींदच्या बेलराखा खेड्यातील तहसील नरवाना येथील रहिवासी युवकाशी २० डिसेंबर २०१७ रोजी झाले होते. तिचे लग्न झाले तेव्हा तिचे वय १५ होते. हे लग्न कैथल जिल्ह्यातील टिट्राट गावात राहणाऱ्या मामाने लावून दिले होते. या महिलेने असा आरोप केला होता की, तिच्या मामाने तिचे सुनीलशी लग्न लावून दिले तेव्हा तिच्या आई-वडिलांनी त्याला विरोध केला आणि सांगितले की, त्यांच्या मुलीचे वय लग्नाला योग्य नाही, मात्र तिच्या आईवडिलांवर दबाव आणत त्याने ते लग्न लावून दिले. नंतर तिच्या पतीच्या बहिणीचे मामाने स्वतः लग्न केले.
बालविवाहानंतर चार वर्षांनी पत्नीने पतीवर केला बलात्काराचा आरोप, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 22:10 IST
Child Marriage And Dowry Case : हुंडाबळीचा त्रास आणि बालविवाहाच्या संदर्भात कारवाई करत महिला पोलिस स्टेशनने मुलाच्या आई-वडिलांसह इतर दोन जणांना अटक केली
बालविवाहानंतर चार वर्षांनी पत्नीने पतीवर केला बलात्काराचा आरोप, म्हणाली...
ठळक मुद्देसदर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत महिलेने सांगितले होते की, तिचे लग्न जींदच्या बेलराखा खेड्यातील तहसील नरवाना येथील रहिवासी युवकाशी २० डिसेंबर २०१७ रोजी झाले होते.