शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चार वर्षांपासून फरार सराईत गुन्हेगारास अटक, बलात्काराचा आरोपी देत होता हुलकावणी

By नरेश रहिले | Updated: April 29, 2023 17:44 IST

न्यायालयात हजर न होता हुलकावणी देणाऱ्या त्या आरोपीविरुद्ध न्यायालयाने पकड वाॅरंट जारी केले होते. ४ वर्षांपासून या फरार आरोपीला गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली आहे.

गोंदिया : शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर फरार आरोपी खन्नाकुमार राजकुमार कुमार (३०, रा. दसखोली, गोंदिया) याच्याविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. न्यायालयात हजर न होता हुलकावणी देणाऱ्या त्या आरोपीविरुद्ध न्यायालयाने पकड वाॅरंट जारी केले होते. ४ वर्षांपासून या फरार आरोपीला गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी हा न्यायालयात पेशी तारखेवर हजर होत नसल्याने न्यायालयाने त्याच्याविरुद्ध पकड वाॅरंट काढला. त्याची माहिती गोंदिया पोलिसांनी काढल्यावर तो जगदलपूर, (छत्तीसगड) येथे आपले नाव बदलवून राहत आहे, अशी माहिती मिळाली. त्या माहितीवरून त्याला अटक करण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाला जगदलपूर, जि. बस्तर, (छत्तीसगड) येथे पाठविण्यात आले होते. पोलीस पथकाने फरार आरोपी खन्नाकुमार राजकुमार कुमार (३०, रा. दसखोली, गोंदिया) याचा शोध घेतला असता तो राजेंद्र राजकुमार कुमार अशा नावाने राहत असल्याचे माहिती झाले. त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे २८ एप्रिल २०२३ रोजी आणण्यात आले. 

खन्नाकुमार राजकुमार कुमार (रा. दसखोली, गाैशाला वाॅर्ड गोंदिया) याच्याविरुद्ध मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय गोंदिया येथे खटला सुरू असून, तो जामिनावर मुक्त आहे. वाजवी कारणाशिवाय जामिनाच्या बंधपत्राच्या शर्तीनुसार मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय गोंदिया समक्ष पेशीवर हजर राहणे अपेक्षित होते; परंतु तो पेशीवर हजर झाला नाही. त्याच्याविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम २२९ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याला अटक करण्याची कारवाई पोलीस हवालदार सुदेश टेंभरे, कवलपालसिंग भाटीया, पोलीस शिपाई कुणाल बारेवार, मुकेश रावते यांनी केली आहे.

खन्नाकुमारवर हे गुन्हे दाखल -गोंदिया शहर पोलिसांना हवा असलेला आरोपी खन्नाकुमार राजकुमार कुमार (३०, रा. दसखोली, गोंदिया) याच्याविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. त्यात कलम ३९९, ४०२, ३५२, ३२३, सहकलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा, सहकलम ६५ (ख) खंड (ड) महाराष्ट्र दारूबंदी कायदा, तसेच भादंविचे कलम ३७६ (ड), सहकलम ४, ५ (एल), ६ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कलम ४५७, ३८०, ३४ अन्वये न्यायालयात खटले सुरू आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय