बाणेरमध्ये वेश्या व्यवसायातील चार महिलांची सुटका; शहरात ३ ठिकाणी स्पावर छापे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 12:15 PM2020-06-24T12:15:54+5:302020-06-24T12:16:26+5:30

पाषाण टेकडीजवळ एका रो हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याची पोलिसांना मिळाली माहिती

Four prostitutes released in Baner; raids on spa centre at 3 places in the city | बाणेरमध्ये वेश्या व्यवसायातील चार महिलांची सुटका; शहरात ३ ठिकाणी स्पावर छापे

बाणेरमध्ये वेश्या व्यवसायातील चार महिलांची सुटका; शहरात ३ ठिकाणी स्पावर छापे

googlenewsNext
ठळक मुद्देमसाज सेंटर सुरु ठेवणाऱ्या तीन ठिकाणी कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे : महिलांना जादा पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या मॅनेजरला चतु:श्रृंगी पोलिसांनीअटक केली आहे़. चार महिलांची सुटका करण्यात आली. सुरेश प्रल्हाद रणवीर (वय २५, रा़ बाणेर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेरमधील धनकुडे वस्तीलगत पाषाण टेकडीजवळ एका रो हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार चतु:श्रृंगी पोलिसांनी तेथे छापा टाकून चार महिलांची सुटका केली.
सामाजिक सुरक्षा विभागाने बंदी असतानाही मसाज सेंटर सुरु ठेवणाऱ्या तीन ठिकाणी कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
धनकवडी येथील चैतन्यनगरमधील आयुर्वेदिक मसाज सेंटर सुरु असल्याची माहिती मिळाली. तेथून ५ महिला व एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले. हडपसर येथील भोसले गार्डनमधील न्यू लोटस आयुर्वेदिक पंचकर्म हे मसाज सेंटर सुरु होते. तेथे छापा घालून २ महिला व एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले. मंत्रा स्पा व मसाज सेंटर हे चालू असल्याची माहिती मिळाल्यावरुन तेथे छापा घालून ३ महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध कोविड उपाय योजना २०२० नुसार कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Four prostitutes released in Baner; raids on spa centre at 3 places in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.