शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

चौघा अल्पवयीन भावंडांची झोपेत हत्या; पालक बाहेरगावी असताना घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 7:23 AM

जळगाव जिल्ह्यातील घटना; अत्याचाराचा संशय

रावेर (जि. जळगाव) : शहरानजीक असलेल्या केळीबागेत रखवालदारांच्या घरात गाढ झोपेत असलेल्या चार अल्पवयीन भावंडांची कुºहाडीने निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सविता (वय १४), राहुल (११), अनिल (८ वर्षे) व सुमन उर्फ नाणी (५ वर्षे) अशी या मुलांची नावे आहेत.

एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाले. चौघांचे मृतदेह हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सायंकाळी उशिरा आल्याने यापैकी मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले असून उर्वरित तिघांचे शनिवारी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे शवविच्छेदन इन कॅमेरा झालेले नाही़ वैद्यकीय सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे़

सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास चौघांचे मृतदेह हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले़. मात्र, सायंकाळी उशीरा शवविच्छेदन होत नाही, असे सांगत केवळ मुलीच्या मृतदेहाचेच शविविच्छेदन करण्यात आले़. मध्यप्रदेशातील गढी (जि.खरगोन) येथील महेताब भिलाला हे अनेक दिवसांपासून शेख मुस्तफा शेख यासीन यांच्या शेतात रखवालदार आहेत. बोरखेडा रस्त्यावरील केळीच्या बागेनजिक ते पत्नी व पाच मुलांसह राहात आहेत. महेताब हे पत्नी व थोरल्या मुलासह मूळ गावी नातवाच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते. त्यांची चार मुले घरीच थांबली होती. त्यावेळी ही घटना घडली.नेमके काय झाले?शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास शेतमालक शेख मुस्तफा (रा. मण्यारवाडा, रावेर) शेतात आले. रखवालदाराच्या घरात डोकावून पाहिले असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह दिसले. घरात खाटेवर एकट्या झोपलेल्या १४ वर्षीय मुलीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून हे क्रूर कृत्य झाले असावे, असा संशय आल्याने त्यांनी या घटनेची खबर पोलिसांना दिली.

या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून साहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस पथक चौकशी करत आहे. दरम्यान, महेताबचा मोठा मुलगासंजय याने त्याच्या काही मित्रांना घराकडे लक्ष ठेवण्यास सांगितले होते. त्यावरून पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

टॅग्स :Murderखून