शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण कुटुंबावर घाला; एर्टिगा आणि दुचाकीचा अपघात, वाहनांचा चक्काचुर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 23:28 IST

Accident : हे सर्व कुटुंब शेतात निंदणीचे काम करून सायंकाळी घरी परतत असताना काळाने संपूर्ण कुटुंबावर घाला घातला.

देवळा : येथील देवळा -नाशिक राज्यमार्गावरील रामेश्वर फाट्याजवळील दुर्गा हॉटेलसमोर  आज शुक्रवारी सायंकाळी इर्टीगा आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात रामेश्वर (ता.देवळा ) येथील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच तर जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने रामेश्वर सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचुर झाला.       याबाबत सविस्तर वृत्त असे कि, रामेश्वर येथील ढेबुड मळा शिवारातील हिरे कुटुंबातील चौघे जण पिंपळगाव (वा.) येथून दुचाकीने ( क्र.एमएच ४१ के ५६६१) शेतीच्या कामावरून घराकडे परतत होते. सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान देवळा -नाशिक राज्यमार्गावरील रामेश्वर फाट्याजवळील दुर्गा हॉटेलसमोरून भावडबारी घाटाच्या दिशेने जात असताना नाशिककडून येणाऱ्या इर्टीगा कारने ( क्र.एमएच ४३ एएल ३००९) दुचाकीला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात हिरे कुटुंबातील गोपीनाथ साळूबा हिरे ( - वय ४२ ), मंगलबाई गोपीनाथ हिरे (-वय ३५) या पती-पत्नीसह मुलगा गोरख गोपीनाथ हिरे (वय १६) हे जागीच ठार झाले तर मुलगी जागृती गोपीनाथ हिरे ( वय १८) हि गंभीर जखमी झाल्याने तिला देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिची अत्यवस्थ परीस्थिती पाहून तिला मालेगाव येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असता मालेगाव येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. देवळा ग्रामीण रुग्णालयात शनिवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येवून त्यांचे वर रामेश्वर येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. याबाबत देवळा पोलिसात रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

गोपीनाथ  हिरे हे पिंपळगाव ( वा ) येथे वाट्याने शेती करत होते. तेथे त्यांनी कांदा लागवड केलेली होती. हे सर्व कुटुंब शेतात निंदणीचे काम करून सायंकाळी घरी परतत असतांना काळाने संपूर्ण कुटुंबावर घाला घातला.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसNashikनाशिकDeathमृत्यू