चार गर्लफ्रेंड्सनी एकाचवेळी घरी दिली घडक, कडाक्याच्या भांडणानंतर भांबावलेल्या प्रियकराने केला आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 14:24 IST2021-11-11T14:24:03+5:302021-11-11T14:24:26+5:30
Crime News: एकाच वेळी चार गर्लफ्रेंड्ससोबत संबंध ठेवणे एका प्रियकराला चांगलेच महागात पडले आहे. पश्चिम बंगालमधील कूच बिहारमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

चार गर्लफ्रेंड्सनी एकाचवेळी घरी दिली घडक, कडाक्याच्या भांडणानंतर भांबावलेल्या प्रियकराने केला आत्महत्येचा प्रयत्न
कोलकाता - एकाच वेळी चार गर्लफ्रेंड्ससोबत संबंध ठेवणे एका प्रियकराला चांगलेच महागात पडले आहे. पश्चिम बंगालमधील कूच बिहारमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रेमसंबंध उघड झाल्याने तणावात येऊन त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
सुभामय नावाचा हा तरुण अत्यंत बेफिकीर जीनव जगत होता. त्याने एकाच वेळी चार तरुणींसोबत मैत्री केली होती. मात्र चारही जणींना एकमेकींबाबत समजले. तेव्हा सर्वांनी या व्यक्तीच्या घराकडे धाव घेतली. तसेच त्याने आपली फसवणूक केल्याचा दावा केला. त्यानंतर या तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
ही घटना कूचबिहारमधील माथाबंगा येथीर जोरपटकी गावात घडली. कालीपूजेनंतर दोन दिवसांनी सुभामय आपल्या नोकरीवर निघाला होता. तो घरातून बाहेर पडण्यापूर्वीच त्याच्या चार गर्लफ्रेंड एकाच वेळी त्याच्या घरात दाखल झाल्या. त्यानंतर त्यांच्यादरम्यान, जोरदार वादावादी झाली. त्यामुळे त्रस्त होऊन सुभामय आपल्या खोलीत आला आणि त्याने विषप्राषन केले. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली.
त्याची बिघडलेली परिस्थिती पाहून शेजाऱ्यांनी त्याला माथाबंगा रुग्णालयात पोहोचवले. नंतर त्याला कूच बिहार जिल्हा रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले आहे. त्याला ही सुद्धा माहिती देण्यात आली आहे की, त्याच्या गर्लफ्रेंडसने त्याच्याविरोधात कुठलीही तक्रार नोंदवलेली नाही. मात्र सुभामय यांनी या प्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले की, आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मात्र डॉक्टरांनी त्याला निरीक्षणाखाली ठेवले आहे.