four children stabbed to death in raver of jalgaon | Jalgaon News : जळगाव हादरलं! रखवालदाराच्या चार मुलांची कुऱ्हाडीनं घाव घालून निर्घृण हत्या

Jalgaon News : जळगाव हादरलं! रखवालदाराच्या चार मुलांची कुऱ्हाडीनं घाव घालून निर्घृण हत्या

रावेर (जि. जळगाव): एका शेतातील रखवालदाराच्या चार मुलांची कुर्‍हाडीने घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना बोरखेडा (ता.रावेर) रोडवर आज सकाळी ८ वाजता  उघडकीस आली. या हत्याकांडाने रावेर हादरले आहे. 

सविता मेहताब भिलाला (वय १४), राहुल (वय ११), अनिल (वय ८) व राणी (वय ५) अशी हत्या करण्यात आलेल्या मुलांची नावे आहेत. शेतातील रखवालदार पती पत्नी गावाला गेले असताना ही घटना घडली. रावेर शहरापासून फर्लांगभर अंतरावर असलेल्या बोरखेडा रोडवरील मुस्तफा यांच्या केळीबागेच्या शेतातील रखवालदार महेताब गुलाब भिलाला हा पत्नी व मोठ्या मुलासह मुळगावी गढी (ता. बिस्टान जि. खरगोन) येथील चुलतभावाच्या नातवाच्या दशक्रियाविधीसाठी गेला होता. गुरुवारी रात्री घरात गाढ झोपलेल्या सविता,  राहुल, अनिल व राणी या चारही मुलांची अज्ञात मारेकऱ्यांनी कुर्‍हाडीने घाव घालून हत्या केली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.
 

Web Title: four children stabbed to death in raver of jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.