बांगलादेशी नागरिकांना पुण्यात अटक; बेकायदा राहत होते...

By किरण शिंदे | Updated: June 14, 2025 21:45 IST2025-06-14T21:44:48+5:302025-06-14T21:45:02+5:30

लष्कराचा गुप्तचर विभाग आणि कोंढवा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.

four Bangladeshi nationals arrested in Pune; were living illegally... | बांगलादेशी नागरिकांना पुण्यात अटक; बेकायदा राहत होते...

बांगलादेशी नागरिकांना पुण्यात अटक; बेकायदा राहत होते...

देशभरात बांगलादेशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केली असून मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणाहून हे बांगलादेशी वेळोवेळी सापडत आहेत. आज चार बांगलादेशी नागरिकांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. 

लष्कराचा गुप्तचर विभाग आणि कोंढवा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईत चार बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले. एका मजूर वसाहतीत हे चारही बांगलादेशी राहत होते. पोलिसांना पाहताच ते पळून जात होते. 

स्वप्न मोंडल, मिथुन कुमार सांतल, रणधीर मोंडल आणि दिलीप मोंडल अशी या अटक झालेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत. 
 

Web Title: four Bangladeshi nationals arrested in Pune; were living illegally...