शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जनआर्शिवाद यात्रेत हात सफाई करणारे चारजण अटकेत; चारही आरोपी मालेगावचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 19:41 IST

Pickpocketers during Jana Arshivad Yatra : हे चारही आरोपी या यात्रेत कार्यकर्ते म्हणून सहभागी झाले असल्याची माहिती देखील तपासात समोर आली आहे.

ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने  अबुबक्र  अन्सारी (३५), नदीत अन्सारी (३०), आतिक अहमद (५१) आणि अश्याक अन्सारी (३८) यांना अटक केली आहे.युनीट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने यात्नेमध्ये काढण्यात आलेले मोबाईल चित्रीकरण तपासले.

ठाणे  : भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या जनआर्शिवाद सहभागी झालेल्यांचे पाकीट मारणाऱ्या चार जणांच्या टोळकीला ठाणो पोलिसांनी अखेर अटक केली आहे. हे चारही आरोपी मालेगाव येथील रहिवासी असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. हे चारही आरोपी या यात्रेत कार्यकर्ते म्हणून सहभागी झाले असल्याची माहिती देखील तपासात समोर आली आहे.

ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने  अबुबक्र  अन्सारी (३५), नदीत अन्सारी (३०), आतिक अहमद (५१) आणि अश्याक अन्सारी (३८) यांना अटक केली आहे. अशी त्यांच्याकडून चोरलेली १ लाख १९ हजार रु पयांची रोकड, १० मोबाईल फोन जप्त केली आहेत. चौघेही आरोपी मालेगाव येथील रहिवासी असून खास जनआशिर्वाद यात्रेत खिसेकापण्यासाठी त्यांनी मालेगाव ते ठाणे असा प्रवास केला होता. सोमवारी ठाणे शहरात भाजपच्या वतीने जनआर्शिवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्नेमध्ये भाजपचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.

याच संधीचा फायदा घेत अबुबक्र, नदीत, आतिक आणि अश्याक हे चौघेही कार्यकर्ते बनून यात्रेत सहभागी झाले. यात्नेची सुरूवात कोपरी येथील आनंदनगर येथे झाली होती. याठिकाणी रस्त्याकडेला एका मंडपही बांधण्यात आला होता. कपिल पाटील या मंडपाच्या येथे आले असता कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला. चौघा चोरट्यांनी गर्दीत कोणाला संशय येऊ नये म्हणून भाजपचे चिन्ह असलेल्या मास्कचा वापर केला. सुरूवातीला या चौघांनी एका नेत्याचे खासगी स्वीय सहाय्यक यांच्या खिशातील एक लाख रुपये गायब केले. त्यानंतर यात्रेमध्ये चालताना एका पत्रकाराचे १५ हजार रुपये तसेच भाजपचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या खिशातील रोकड, मोबाईल चोरी केले. या घटनेप्रकरणी संबंधित पत्रकार आणि स्वीय साहाय्यकाच्या मदतनीसाने कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणाचा समांतर तपास ठाणो गुन्हे अन्वेषण शाखा युनीट पाचकडून सुरू होता.

युनीट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने यात्नेमध्ये काढण्यात आलेले मोबाईल चित्रीकरण तपासले. तसेच संशयित दिसणाऱ्यांची छायाचित्न गोळा केली. संशियतांची छायाचित्ने खबऱ्यांना पाठविण्यात आले. त्यावेळी छायाचित्नांतील चार जण हे मालेगावमधील रहिवासी असून ते सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पथकाने चोरट्यांचे मोबाईल क्रमांक मिळविले. त्यांच्या मोबाईलचे स्थळ तपासले असता ते शिळफाटा येथील एका हॉटेलमध्ये दाखिवत होते. त्यानंतर पोलिसांनी शिळफाटा येथील हॉटेलमधून चारही चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे १ लाख १८ हजार रुपयांची रोकड, १० मोबाईल फोन आढळून आले. याप्रकरणी चारही जणांना अटक करण्यात आल्याची माहिती विकास घोडके यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेPoliceपोलिसArrestअटकRobberyचोरीBJPभाजपा