शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक, सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 3:28 PM

नऱ्हे येथे भरदिवसा हॉटेल व्यावसायिकाचा खून झाला होता..

पुणे :नऱ्हे येथील हॉटेल व्यावसायिकाचा भर दिवसा कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणी चार जणांना सिंहगड रस्ता पोलिसांनीअटक केली आहे. आकाश नितीन दामगुडे (वय: २६, नांदेडसिटी, पुणे)संतोष रामचंद्र नातकी (वय:२८, शनीनगर , कात्रज, पुणे) गणेश तुकाराम गावरे (वय: २२, अप्पर इंदिरानगर, पुणे) सुधीर राजाराम कामठे (वय: २२, कुसगाव, ता. भोर, पुणे) अशा चौघा आरोपीना पोलिसांनीअटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.  शुक्रवारी( ता. १२ जून) सायंकाळी सहा वाजनेच्या सुमारास हॉटेल व्यावसायिक सुनील लांगोरे (वय : ४०, रा. नऱ्हे,  पुणे) हे हॉटेल समोर उभे असताना अज्ञात चार तरुणांनी त्यांच्यावर कोयत्याने वार करून खून केला. त्यानंतर ते पळून गेले. घटनेच्या ठिकाणी व येणाऱ्या - जाणाऱ्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहून त्यांचे विश्लेषण करून तसेच पोलीस कर्मचारी श्रीकांत दगडे यांना बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीवरून सदर आरोपींची नावे उघड झाली. सिंहगड रस्ता पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण दहशतवादी विरोधी पथक व गुन्हे शाखा युनिट २ यांनी संयुक्तिक कामगिरी करून सदर चारही आरोपींना विविध ठिकाणांवरून ताब्यात घेतले.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड , सहा पोलीस आयुक्त पी डी राठोड , वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकिशोर शेळके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चेतन थोरबोले, पोउपनि सुधीर घाडगे, पोलीस कर्मचारी दत्ता सोणवणे, दयानंद तेलंगेपाटील, श्रीकांत दगडे, पुरुषोत्तम गुन्ला, सचिन माळवे, योगेश झेंडे, हरीश गायकवाड, बालाजी जाधव, किशोर शिंदे, अविनाश कोंडे, राहुल शेडगे, राजेश गोसावी, यशवंत ओंबासे, मोहन भुरूक, राजेंद्र सुर्वे यांनी केली.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके करीत आहेत.

टॅग्स :DhayariधायरीMurderखूनArrestअटकPoliceपोलिस