चौघांना तरुणाच्या हत्येप्रकरणी अटक; पूर्ववैमनस्यातून उचलले पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 09:33 IST2024-07-04T09:32:51+5:302024-07-04T09:33:25+5:30

कोळसेवाडी पोलिसांनी पेंद्या ऊर्फ अरविंद गाळपांडे याच्यासह एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे.

Four arrested for youth's murder; A step taken from previous animosity | चौघांना तरुणाच्या हत्येप्रकरणी अटक; पूर्ववैमनस्यातून उचलले पाऊल

चौघांना तरुणाच्या हत्येप्रकरणी अटक; पूर्ववैमनस्यातून उचलले पाऊल

कल्याण - शहराच्या पूर्व भागातील शंभर फुटी रस्त्याच्या चौकात १ जुलै रोजी संदीप राठोड याची पाच जणांनी धारदार हत्याराने हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस, कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही हत्या पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून झाली आहे. या प्रकरणातील अन्य एक आराेपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

संदीप हा द्वारलीपाडा येथे राहत होता. तो १ जुलै रोजी सायंकाळी त्याचा मित्र प्रेम चव्हाण याच्यासोबत दुचाकीवरून घरी निघाला होता. वाटेत शंभरफुटी चौक येथे  एका दारूच्या दुकानातून बीअर घेण्यासाठी संदीप आणि प्रेम थांबले होते. ते परत निघाले असता त्याच चौकात पाच जणांनी संजय याच्यावर चॉपरने हल्ला केला. हल्ला करून ते पसार झाले. 

आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल 
कोळसेवाडी पोलिसांनी पेंद्या ऊर्फ अरविंद गाळपांडे याच्यासह एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शैफ ऊर्फ साहिल शेख आणि विद्यासागर मूर्तील ऊर्फ अण्णा या दोघांना अटक केली आहे. अटक आरोपींपैकी पेंद्या याचे संदीप सोबत काही महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. याप्रकरणी संदीपने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या भांडणाचा राग पेंद्याच्या मनात होता.  संदीपचा वचपा काढण्यासाठी पेंद्याने अन्य तीन साथीदारांना घेऊन संदीपला गाठले. त्याच्यावर चॉपरने हल्ला करून त्याची हत्या केली. आरोपींच्या विरोधात पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Four arrested for youth's murder; A step taken from previous animosity