पिंपरीत आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर बेटींग घेणाऱ्या चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 15:07 IST2019-03-31T15:07:08+5:302019-03-31T15:07:33+5:30

इंडियन प्रिमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल विरुद्ध सनराईज हैद्राबाद यांच्यात शुक्रवारी टी-२० सामना होता.

Four arrested for betting on cricket matches in IPL | पिंपरीत आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर बेटींग घेणाऱ्या चौघांना अटक

पिंपरीत आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर बेटींग घेणाऱ्या चौघांना अटक

ठळक मुद्देटिव्ही, १३ मोबाईल, रायटिंग पॅड, लॅपटॉप आदी १ लाख ६४ हजार १५५ रुपयांचे साहित्य ताब्यात

पिंपरी : क्रिकेट सामन्यावर बेटींग घेणारया चौघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार वाकड येथे शुक्रवारी (दि. २९) रात्री आठच्या सुमारास घडला. विशाल राजु अग्रवाल (वय २०, रा. लक्ष्मी शाळेजवळ, आंबेडकर कॉलनी, पिंपरी रिव्हर रोड, पिंपरी), अनिल आदेश कृपलानी (वय ३१, रा. गलाड चौक, पिंपरी), दिनेश पैलाजराय बदलानी (वय ३२, रा. आझाद कॉलनी क्रमांक १, काळेवाडी, पिंपरी), राहुल तुकाराम कवाष्टे (वय ४२, रा. सर्व्हे क्रमांक ५३/५, विनायकनगर, सदगुरु कृपा, पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. इंडियन प्रिमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल विरुद्ध सनराईज हैद्राबाद यांच्यात शुक्रवारी टी-२० सामना होता. या सामन्यावर वाकड येथील पटेल गॅरेजच्या पाठीमागे असलेल्या सिद्धीविनायक अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक २०१ येथे आरोपी मोबाईलद्वारे बोली स्विकारुन लॅपटॉपच्या साहाय्याने बेटींग घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करीत चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांना येथे एलईडी टिव्ही, सेट टॉप बॉक्स, १३ मोबाईल, रायटिंग पॅड, पेन, इलेक्ट्रीक वायर, मोबाईल चार्जर, लॅपटॉप आदी १ लाख ६४ हजार १५५ रुपयांचे साहित्य ताब्यात घेतले. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. इंडियन प्रिमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल विरुद्ध सनराईज हैद्राबाद यांच्यात  टी-२० सामना होता. या सामन्यावर वाकड येथील पटेल गॅरेजच्या पाठीमागे असलेल्या सिद्धीविनायक अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक २०१ येथे आरोपी मोबाईलद्वारे बोली स्विकारुन लॅपटॉपच्या साहाय्याने बेटींग बेटींग घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करीत चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांना येथे एलईडी टिव्ही, सेट टॉप बॉक्स, १३ मोबाईल, रायटिंग पॅड, पेन, इलेक्ट्रीक वायर, मोबाईल चार्जर, लॅपटॉप आदी १ लाख ६४ हजार १५५ रुपयांचे साहित्य ताब्यात घेतले. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Four arrested for betting on cricket matches in IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.