Four actors released from sex racket | सेक्स रॅकेटमधील चार कलाकारांची सुटका

सेक्स रॅकेटमधील चार कलाकारांची सुटका

मुंबई : सेक्स रॅकेटप्रकरणी कांदिवलीच्या स्टारबक्समधून समाजसेवा शाखेने गुरुवारी केलेल्या कारवाईतून बॉलीवूड चित्रपट आणि मालिकांमधील चार कलाकारांची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईत तीन दलालांना अटक करण्यात आली आहे. यात, अहमदाबाद वायुदूत इंडिगो एअरलाइन ट्रान्सपोर्ट व्यवस्थापक आदित्य, अंधेरीत एका प्रोडक्शन हाउसमध्ये काम करणारी प्रियांका आणि अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणारी प्रमिला यांचा समावेश आहे.
सुटका करण्यात आलेल्या दोघींनी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका बजावली आहे. यातील एक मुलगी १६ वर्षांची असून तिला जबरदस्तीने यात ढकलण्यात आले आहे. समाजसेवा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांच्या नेतृत्वात गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
 

Web Title: Four actors released from sex racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.