माजी नगरसेवकाच्या घरासमोरून फॉर्च्युनर कार चोरट्यांनी केली लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 18:36 IST2018-11-12T18:32:54+5:302018-11-12T18:36:10+5:30
याप्रकरणी कारमालक दिनेश चिंचवडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तपस सुरु केला असून सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

माजी नगरसेवकाच्या घरासमोरून फॉर्च्युनर कार चोरट्यांनी केली लंपास
पुणे - रहाटणी येथे माजी नगरसेवक कैलास थोपटे यांच्या घरासमोरील पार्क केलेली फॉर्च्युनर कार चोरट्यांनी लंपास केली आहे. याप्रकरणी कारमालक दिनेश चिंचवडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तपस सुरु केला असून सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रहाटणी येथे माजी नगरसेवक कैलास थोपटे यांच्या घरासमोर दिनेश चिंचवडे यांनी आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास फॉर्च्युनर कार पार्क केली होती. मात्र, काही अज्ञात चोरटयांनी बनावट चावीच्या सहाय्याने कारचा दरवाजा उघडून, कार सुरु करून पुणे - मुंबई महामार्गाच्या दिशेने कार घेऊन गेले.मात्र. भरदिवसा ही चोरीचा घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. याप्रकरणी चिंचवडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी घटनास्थळाहून सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध घेणं सुरु केलं आहे.