शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हत्येची सुपारी देणारा भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादवला गुजरात राजस्थान सीमेवर केले जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 10:52 IST

तपासादरम्यान बबलू गवळी याला मारण्यासाठी विवेक यादव याने सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले होते.

ठळक मुद्देतपासादरम्यान बबलू गवळी याला मारण्यासाठी विवेक यादव याने सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले होते.

पुणे : विरोधी टोळीतील गुन्हेगाराच्या हत्याची सुपारी देणार्‍या भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याला कोंढवा पोलिसांनी गुजरात राजस्थान बॉर्डरवर अटक केली. यापूर्वी कोंढवा पोलिसांनी राजन जॉन राजमणी आणि इब्राहिम ऊर्फ हुसेन याकुब शेख या दोघांना पिस्तुले बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांना बबलू गवळी याला मारण्यासाठी विवेक यादव याने सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले होते. त्यासाठी या दोघा गुन्हेगारांना यादव याने ३ पिस्तुले व ७ काडतुसे व रोख रक्कम दिली होती. 

विवेक यादव हा भाजपचा पुणे कॅन्टोमेंटचा माजी नगरसेवक आहे. बबलु गवळी आणि विवेक यादव यांच्यात पूर्वीपासून दुश्मनी आहे. यादव याच्यावर  बबलु गवळी याने २०१६ मध्ये यादव याच्यावर गणेशोत्सव काळात विसर्जन मिरवणुकीत गोळीबार करुन गंभीर जखमी केले होते. त्याचा बदला घेण्यासाठी विवेक यादव याने शिक्षा भोगत असलेला व सध्या कोरोनामुळे जामिनावर बाहेर आलेल्या राजन राजमणी याला सुपारी दिली होती. 

राजमणी याला पोलिसांनी अटक केल्यानंतर विवेक यादव फरारी झाला होता. त्याच्या तपासासाठी वेगवेगळी तीन पथके शोध घेत होती. तो गुजरात बॉर्डरवर असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी बुधवारी रात्री गुजरात आणि राजस्थान सीमेवरून अटक केली.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरात