आधी मारलं-झोडलं, मग 'त्याला' थुंकी चाटायला लावली; निवडणुकीत मदत न केल्यानं माजी सरपंचाची गुंडगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 15:28 IST2021-04-13T15:07:41+5:302021-04-13T15:28:01+5:30
Crime News : आगामी पंचायत निवडणूकीत साथ देण्यास आणि प्रचार करण्यास नकार दिल्याने ही अमानुष वागणूक देण्यात आली आहे.

आधी मारलं-झोडलं, मग 'त्याला' थुंकी चाटायला लावली; निवडणुकीत मदत न केल्यानं माजी सरपंचाची गुंडगिरी
नवी दिल्ली - बिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निवडणुकीत मदत न केल्याने माजी सरपंचाची गुंडगिरी पाहायला मिळाली आहे. निवडणुकीत साथ देण्यास नकार दिला म्हणून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. संतापजनक बाब म्हणजे त्याला थुंकी चाटायला लावली आहे. आगामी पंचायत निवडणूकीत साथ देण्यास आणि प्रचार करण्यास नकार दिल्याने ही अमानुष वागणूक देण्यात आली आहे. माजी सरपंच आणि त्याच्या काही कार्यकर्त्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली आहे. या भयंकर घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात केली असून अनेकजण फरार झाले आहेत. मिळालेल्य़ा माहितीनुसार, बिहारच्या गया येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित तरुणाने घुरियावां पंचायतच्या माजी प्रमुख अभय कुमार सिंह यांना निवडणुकीत साथ देण्यास आणि प्रचार करण्यास नकार दिला होता. त्यामुळे संतापलेल्या अभय कुमार सिंह आणि त्यांच्या काही समर्थकांनी सुरुवातीला तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच घरी बोलावून स्वतःची आणि उपस्थित असणाऱ्या अन्य लोकांची थुंकी चाटायला लावली आहे.
धक्कादायक! पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रचला बनाव पण झालं असं काही...https://t.co/vGua59MbN2#crime#Police#Car
— Lokmat (@MiLOKMAT) April 12, 2021
भयंकर प्रकाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून यामध्ये तरुणाला करण्यात आलेली मारहाण पाहायला मिळत आहे. तसेच थुंकी चाटण्यासाठी त्यावर दबाव टाकला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर पीडित तरुणाने दुसरा एक व्हिडीओ तयार करून कारवाईची मागणी केली आहे. त्याचबरोबर माजी सरपंचाने आपल्याला थुंकी चाटायला लावली असल्याचंही त्याने व्हिडीओत म्हटलं आहे. शिवाय आरोपींनी रात्री घरी येऊन आपल्या घरच्यांना मारहाणही केली आहे असं देखील म्हटलं आहे.
लुटेरी दुल्हन! बाथरूमला जाण्याचं कारण सांगत दागिने आणि पैसे घेऊन काढला पळ, नंतर झालं असं काही...https://t.co/hwJBsOrQft#crime#Police
— Lokmat (@MiLOKMAT) April 12, 2021
भीतीमुळे पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी गाव सोडलं असून नातेवाईकांच्या घरी आसरा घेतला आहे. या घटनेचा व्हायरल व्हिडीओ समोर आल्यानंतर एसएसपी आदित्य कुमार यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. व्हिडीओच्या आधारे कारवाई करत वजीरगंज पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. या घटनेतील अनेक आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus Live Updates : कोरोना संकटात रुग्णालयाचा निष्काळजीपणा! वेळेत उपचार न मिळाल्याने प्राध्यापिकेला गमवावा लागला जीव https://t.co/cwYZL6UQLa#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) April 13, 2021