शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सायबर क्राईमचा ठरले बळी, एक लाखाचा घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 12:57 PM

Former Indian cricketer Vinod Kambli : मोबाईलवर मेसेज येताच फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई - महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मित्र माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) सायबर क्राईमचा बळी ठरला आहे. त्यांच्या खात्यातून एक लाख रुपये काढण्यात आले आहेत. मोबाईलवर मेसेज येताच फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गुरुवारी एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बँक अधिकारी म्हणून एका व्यक्तीने विनोद कांबळी यांना फोन केला. त्यानंतर लिंक पाठवली. कांबळीच्या लिंकवर काही वेळाने त्याच्या खात्यातून एक लाख रुपये काढण्यात आले. खात्यातून पैसे काढण्याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर आला.

या संदर्भात मंगळवारी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपींचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे 2018 मध्ये सप्टेंबरपर्यंत सायबर क्राइमशी संबंधित 1,081 प्रकरणे नोंदवण्यात आली होती, तर 2019 मध्ये ही संख्या 1,686 इतकी वाढली.

 फसवणूक करणारे तुम्हाला 'या' गोष्टी विचारतात आणि माहिती घेतात, सतर्क रहा

- कोषागार अधिकारी किंवा बँक कर्मचारी असल्याचं स्वत: फोन करून सांगतात. पेन्शन खाते अपडेट करण्याचे नाटक करतात. कोरोनाचा काळ आहे, तुम्हाला येण्याची गरज नाही, तुम्ही तपशील द्या, काम होईल, असे सांगितले जाते.

-ऑनलाइन शॉपिंगसाठी नामांकित वेबसाइट्सशिवाय इतर अज्ञात वेबसाइट्स निवडणे टाळा. - जेव्हा तुम्ही खात्यातून तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक बदलता तेव्हा निश्चितपणे बँकेला लेखी माहिती द्या. - इंटरनेट मीडियावर अंतरंग फोटो शेअर करणे टाळा, जास्त खाजगी फोटो शेअर करू नका. - अनोळखी नंबरवरून येणारे व्हिडिओ कॉल्स घेणे टाळा. - तुमचा बँक तपशील किंवा पिन कोड फोनवर कोणाशीही शेअर करू नका. - बँक कधीही फोनवर किंवा ईमेलद्वारे तुमचा पासवर्ड विचारणार नाही. - पासवर्डमध्ये, कॅपिटल आणि लहान अक्षरे तसेच चिन्हे वापरा. पासवर्ड खूप सोपे बनवू नका. - सोशल मीडियावरील सार्वजनिक प्रणालींवर सक्रिय आयडी उघडणे टाळा. - तुमचा वैयक्तिक संगणक आणि मोबाईल वापरा. - अनोळखी लोकांना एड करू नका तुमची वैयक्तिक माहिती आणि फोटो फेसबुकवर शेअर करू नका.-  पासवर्ड आणि सोशल अकाउंट्स वेळोवेळी तपासत राहा.

अशा प्रकारे ऑनलाइन तक्रार करा

 नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (NCRP) पोर्टलवर तक्रार नोंदवण्यासाठी, प्रथम Google वर https://cybercrime.gov.in ही लिंक उघडा.  तेथे तुम्हाला दोन पर्याय मिळतील.  पहिल्या पर्यायात सायबर क्राइम, तर दुसऱ्या पर्यायावर नवीन विंडो उघडेल.  या विंडोवर देखील दोन पर्याय दिसतील.  यातील पहिला पर्याय महिलांच्या गुन्ह्याशी संबंधित सायबर गुन्ह्याचा आहे, तर दुसऱ्या पर्यायामध्ये इतर प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची नोंद करण्याची सुविधा आहे.  हे लक्षात घेण्यासारखे आहे की एनसीआरपी पोर्टलवर आतापर्यंत केवळ महिला किंवा मुलांशी संबंधित सायबर गुन्ह्यांची नोंद केली जात होती. 

टॅग्स :Vinod Kambliविनोद कांबळीcyber crimeसायबर क्राइमMONEYपैसा