शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पोलिसांचे पुन्हा एकाचवेळी जळगावसह सहा ठिकाणी धाडसत्र, माजी उपनगराध्यक्षाला घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 10:24 IST

crime news : जळगाव शहरातून सराफ तथा हाॅटेल व्यावसायिक भागवत भंगाळे यांना मॉर्निंग वॉक करताना सहा वाजता झाला घेतले तर भुसावळ येथे माजी उपनगराध्यक्ष आसिफ मुन्ना तेली, जामनेर येथून पंचायत समितीचे माजी सभापती व नगरसेवक छगन झाल्टे यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

जळगाव : बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी पुन्हा जळगाव शहर, जामनेर, पाळधी ,भुसावळ, औरंगाबाद, अकोला व पुणे येथे एकाच वेळी धाडसत्र सुरू केले. जळगाव शहरातून सराफ तथा हाॅटेल व्यावसायिक भागवत भंगाळे यांना मॉर्निंग वॉक करताना सहा वाजता झाला घेतले तर भुसावळ येथे माजी उपनगराध्यक्ष आसिफ मुन्ना तेली, जामनेर येथून पंचायत समितीचे माजी सभापती व नगरसेवक छगन झाल्टे यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

भागवत भंगाळे यांना जिल्हापेठ तर संजय तोतला यांना शहर पोलिस ठाण्यात बसवण्यात आलेले आहे. इतर सर्व जणांना त्या त्या पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. दिवसभर ही कारवाई चालणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे येथील सेवानिवृत्त शिक्षिका रंजना घोरपडे यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून २५ नोव्हेंबर २०२० रोजी अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह दहा जणांवर फसवणूक व्यापाराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच महिन्यात पुणे पोलिस दुसऱ्यांदा जळगावात आले.

यांना केली अटकसराफ तथा हाॅटेल व्यावसायिक भागवत भंगाळे, दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम नारायण कोगटा, संजय तोतला, जयश्री शैलेश मणियार (सर्व रा. जळगाव) जितेंद्र रमेश पाटील, कापूस व्यापारी राजेश लोढा (रा.जामनेर), जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती व नगरसेवक छगन झाल्टे, भुसावळचे माजी उपनगराध्यक्ष आसिफ मुन्ना तेली (रा. भुसावळ), प्रितेश चंपालाल जैन ( रा.धुळे), अंबादास आबाजी मानकापे ( रा.औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला ( रा. मुंबई) व प्रमोद किसनराव कापसे (रा.अकोला) या १२ जणांना गुरुवारी एकाच वेळी अटक करण्यात आली आहे. यासाठी १५ पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. प्रेम कोगटा यांना पुण्यातील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले.

मोठे कर्ज घेऊन ठेवीदारांच्या पैशात समायोजित केलीआर्थिक गुन्हे शाखेचे पंधरा पथके या कारवाईसाठी नियुक्त करण्यात आलेली आहेत. अटकेतील या सर्व जणांनी मोठमोठी कर्ज घेऊन ती ठेवीदारांच्या पैशात समायोजित केल्याचे पुरावे मिळालेले आहेत. यात ठेवीदारांचे पैसे बुडाले तर कर्जदार मालामाल झालेले आहे.

जळगाव सहा ठिकाणी पंधरा पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. दिवसभर अटक व पंचनाम्याची कारवाई चालेल, त्यानंतर पथक पुण्याकडे रवाना होईल. अटकेतील व्यक्तींबाबत ठोस पुरावे मिळालेली आहेत.- भाग्यश्री नवटके, उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिस