शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

दारुच्या नशेत तरुणीवर जबरदस्ती, मैत्रिणीच्या मदतीने केला तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 5:15 PM

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव साहिल असून मृत व्यक्तीची मैत्रिण प्रिया आणि इतर दोन जणांनी मिळून साहिलचा खून केला. शास्त्री नगर येथील आपल्या घरी साहिलसोबत मारहाण केल्यानंतर गळा दाबून त्याचा खून केला.

ठळक मुद्देपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव साहिल असून मृत व्यक्तीची मैत्रिण प्रिया आणि इतर दोन जणांनी मिळून साहिलचा खून केला. शास्त्री नगर येथील आपल्या घरी साहिलसोबत मारहाण केल्यानंतर गळा दाबून त्याचा खून केला.

नवी दिल्ली - दिल्लीपोलिसांनी एका हत्याप्रकरणात महिलेसह तीन आरोपींनी अटक केली आहे. उत्तर दिल्लीतील वजीराबाद येथे 11 सप्टेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी एक मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर संबंधित व्यक्तीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तपास केल्यानंतर 24 वर्षीय महिलेसह तिच्या भावाला आणि मित्राला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव साहिल असून मृत व्यक्तीची मैत्रिण प्रिया आणि इतर दोन जणांनी मिळून साहिलचा खून केला. शास्त्री नगर येथील आपल्या घरी साहिलसोबत मारहाण केल्यानंतर गळा दाबून त्याचा खून केला. त्यानंतर, जवळच निर्मनुष्य असलेल्या रस्त्यावर त्याचा मृतदेह टाकून देण्यात आला होता. साहिल हा दारुच्या नशेत होता, त्याने जबरदस्ती करत शारीरिक संबंध बनविण्याचा प्रयत्न केला होता, असे आरोपी महिलेने म्हटले आहे. 

साहिलच्या जबरदस्तीला विरोध केल्यानंतर साहिलने आरोपी महिलेला सिगारेटचा चटका दिला. त्यामुळे, रागाच्या भरात तिघांनी एकत्र येऊन साहिलचा गळा आवळून खून केला. 

टॅग्स :Murderखूनdelhiदिल्लीPoliceपोलिस