शेत अन् घरासाठी भाऊच जीवावर उठला; सत्तूरनं केला जीवघेणा हल्ला
By विलास जळकोटकर | Updated: May 25, 2023 15:39 IST2023-05-25T15:38:33+5:302023-05-25T15:39:15+5:30
या मारहाणीत राजेंद्र सुभाष सुरवसे (वय ४५) हा जखमी झाला तर स्वामीराव सुरवसे, सुभाष सुरवसे व इतर दोघे अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत.

शेत अन् घरासाठी भाऊच जीवावर उठला; सत्तूरनं केला जीवघेणा हल्ला
सोलापूर : शेत आणि घरासाठी असलेल्या वादातूृन दोन भावांमध्ये शाब्दीक चकमक होऊन भावानं दुसऱ्या भावावर सत्तूरने वार करुन जीवघेणा हल्ला केला. अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली.
या मारहाणीत राजेंद्र सुभाष सुरवसे (वय ४५) हा जखमी झाला तर स्वामीराव सुरवसे, सुभाष सुरवसे व इतर दोघे अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. राजेंद्र आणि स्वामीराव यांच्यामध्ये गेली काही दिवसांपासून त शेती आणि घराच्या कारणातून वाद आहे. यातूनच बुधवारी त्यांच्यात वाद झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास स्वामीराव व सुभाष यांनी इतर दोघांच्या साथीने राजेद्रला सत्तुरने वार करून जखमी केले. यात राजेंद्र यांच्या डोक्याला जखम झाली. पाठीला मुका मार लागला आहे. सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून रात्री ११ वाजता पत्नी उर्मिला यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले. या घटनेची सिव्हील पोलीस चौकीत नोंद झाली आहे.