शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नेत्यासह पाच जणांवर गॅंगरेपचा आरोप, पीडितेचे अपहरण करून केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 21:38 IST

Gangrape Case : आरोपींमध्ये भाजप नेते आयटी सेलचे जिल्हा प्रभारी असल्याचे सांगितले जाते.

आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील बरहान पोलीस ठाण्यात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या वडिलांनी भाजप नेत्यासह पाच जणांवर मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. वडिलांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पाच जणांचा समावेश असून, 12 अज्ञातांचा समावेश आहे. आरोपींमध्ये भाजप नेते आयटी सेलचे जिल्हा प्रभारी असल्याचे सांगितले जाते.बरहान पोलीस स्टेशन हद्दीतील गावातील रहिवासी असलेली ही तरुणी एतमादपूर येथील महाविद्यालयात जाण्यासाठी घरातून निघाली होती. भाजप नेते भोला सिंह यांनी रस्त्यात अडवून तिला गाडीत बसवले असा आरोप आहे. त्यानंतर तो पीडितेला घेऊन गाझियाबादला गेला. जिथे तिच्यावर भोला सिंग आणि त्याच्या साथीदारांनी सामूहिक बलात्कार केला. तक्रार करूनही लक्ष दिले नसल्याचे पीडितेच्या वडिलांचे म्हणणे आहे. त्यानंतर त्यांनी एसएसपी यांची भेट घेतली. एसएसपीच्या आदेशानंतर बरहान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुरावे गोळा करण्यात येत असल्याचे पोलीस स्टेशन प्रभारी शेर सिंह यांनी सांगितले.आरोपींनी तिचे अपहरण करून कारमधून नेलेपीडितेच्या वडिलांनी एसएसपीला सांगितले की, 29 मे रोजी त्यांची मुलगी एतमादपूर कॉलेजमध्ये गेली होती. त्यानंतर ती घरी परतली नाही. शोध घेतल्यानंतर त्यांच्या मुलीचे अपहरण भाजप नेते भोला सिंग याने केल्याचे आढळून आले. भोलाच्या गाडीत आणखी तीन-चार जण बसले होते. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. 1 जून रोजी त्यांची मुलगी सादाबादजवळील सरोत गावात एका जर्जर हॉलमध्ये सापडली होती, तिने सांगितले की, भोला सिंग कॉलेजच्या बाहेर आला. गावाला घेऊन जायचे सांगून मला गाडीत बसवले. कारमध्ये ती बेशुद्ध पडली. यानंतर तिला गाझियाबादला नेण्यात आले, जिथे सामूहिक बलात्कार झाला. विरोध केल्याने त्यांना मारहाणही करण्यात आली.आर्य समाजाच्या मंदिरात लग्न झालेआरोपी भाजप नेता पीडितेला अनेक महिन्यांपासून त्रास देत होता. पीडितेचे लग्नही ठरले होते, मात्र भाजप नेते तिला लग्न करू देत नव्हते. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलीचे अपहरण केल्यानंतर त्यांनी 30 मे रोजी आर्य समाज मंदिरात जबरदस्तीने लग्न केले. विरोध केल्यावर, तिच्यासोबत स्वतःला भाजपचा नेता म्हणून गुंडगिरी करू लागला.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसmarriageलग्नKidnappingअपहरणBJPभाजपा