Five members of family death in Gun firing In US | अंदाधुंद गोळीबारात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू 
अंदाधुंद गोळीबारात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू 

वॉशिंग्टन - अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका घरात झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. दरम्यान, संशयित आरोपी हा मृतांमधीलच एक असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ही घटना अमेरिका-मेक्सिको सीमेपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या पॅराडाइज हिल येथे घ़डली. सकाळी ६.४९ च्या सुमारास आम्हाला एक फोन आला. जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा गोळीबारात जखमी झालेले काही लोक आम्हाला आढळून आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 घटनास्थळावर तीन वर्षांचा एक मुलगा, २९ वर्षांची एक महिला आणि ३१ वर्षांचा एक पुरुष मृतावस्थेत आढळले. जखमी अवस्थेत सापडलेल्या पाच आणि आणि नऊ वर्षांच्या दोन मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला.  त्याशिवाय ११ वर्षांच्या एका मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Five members of family death in Gun firing In US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.