शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

स्कुटीच्या डिक्कीतून पाच लाख चोरले, आरोपी २४ तासाच्या आत ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 21:40 IST

परभणीतील वसमत रोड भागातील घटना : स्थागुशा, मोंढा  पोलिसांची कारवाई 

परभणी : शहरातील वसमत रोड परिसरात वसंतराव नाईक यांच्या पुतळा परिसरात एका हॉटेल समोर लावलेल्या स्कुटी वाहनातील डिक्कीत ठेवलेली पाच लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यानेचोरून नेली. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर आरोपीस २४ तासाच्या आत चोरलेल्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हा शाखा आणि नवा मोंढा पोलिसांच्या पथकाने मंगळवारी ताब्यात घेतले. 

याप्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात मंगळवारी दुपारी गुन्हा नोंद करण्यात आला. व्यापारी आकाश प्रकाशराव ढाकणे यांनी फिर्याद दिली. फिर्यादी यांच्या स्कुटी क्रमांक (एमएच २२ एझेड ००८०) यामध्ये डिक्कीत पाच लाख रुपये रोकड त्यांनी ठेवली होती. सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे वसंतराव नाईक पुतळा परिसरातील विठ्ठल हॉटेल समोर आले होते. त्यांनी तेथे त्यांची दुचाकी लावली. यामध्ये स्कुटीच्या डिक्कीत पाचशे रुपयांच्या एक हजार नोटा असलेले पाच लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. तपास पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर करीत आहेत. जीवारथीनम डेव्हिड बाबू (३३, रा. राजमनगाम, विल्लीवक्कम, जि. चेन्नई) यास सापळा रचून परभणी शहरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे मुद्देमालाची विचारणा करून पैसेही जप्त करण्यात आले.

यांनी केली कामगिरी ही कामगिरी पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ, सहाय्यक पोलिस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, महादेव मांजरमकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, गणेश कौटकर, अनिल कटारे, अर्जुन टाक, रामेश्वर मुंडे, नागरगोजे यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Scooty's Trunk Looted: Five Lakhs Stolen, Thief Caught in 24 Hours

Web Summary : ₹5 lakh stolen from a scooty in Parbhani was recovered within 24 hours. Police arrested the thief, Givarathinam David Babu, from Chennai. The case was registered following a complaint by trader Akash Dhakne.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसThiefचोर