शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

काळाचा घाला! गाणगापूरहून परतताना पाच भाविक अपघातात जागीच ठार; दोन गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 22:13 IST

Big Accident : ते कर्नाटकातील प्रसिध्द दत्त मंदिर गाणगापूर येथे दर्शन करून अक्कलकोट मार्गे अहमदनगरकडे जात होते.

देवदर्शन करून परतताना कार झाडाला आदळून पाच ठार,दोघे जखमी

अक्कलकोट : महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील एक कुटुंबीय कर्नाटक राज्यातील गाणगापूर येथील श्री दत्ताचे देवदर्शन करून परतीचा प्रवास करीत होते. दरम्यान टायर फुटून कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. त्यात पाच जण जागेवर ठार झाले तर दोघेजण गंभीरजखमी झाले आहेत. ही घटना दि.११ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याबाबत अफझलपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मयत बाबासाहेब सखाराम वीर (वय ५४), कोमल बाबासाहेब वीर, राणी बाबासाहेब वीर, अनव्वा हिराबाई बडे, छाया बाबासाहेब वीर (वय ५० रा.सर्व रा. अहमदनगर) असे पाचजण जागेवर ठार झाले आहेत तर सायली बाबासाहेब वीर (वय १३), चैत्राली दिनकर सूर्यवंशी (वय ०२) या दोघी गंभीर जखमी झाले आहेत. अहमदनगर येथून कारने गाणगापूर येथे दर्शनासाठी गेले होते. मनोभावे दर्शन करून संपूर्ण कुटुंब परतीचा प्रवास करीत होते. अफझलपूर तालुक्यातील बळोरगी गावाजवळील गुत्तेदार यांच्या शेताजवळ येताच कारचा पुढचा टायर फुटला. तेव्हा कार फरफटत रोडच्या कडेला असलेल्या कडूलिंबाच्या झाडाला जाऊन आदळली. वेगात असलेल्या कारची समोरची बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. त्यामधील पाचजण जागेवर ठार झाले तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अफझलपूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल होऊन रीतसर पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसAhmednagarअहमदनगरDeathमृत्यू