तलावाच्या ठेक्यासाठी १५ हजारांची लाच घेताना मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 19:28 IST2019-05-07T19:27:22+5:302019-05-07T19:28:38+5:30
एका मत्स्य व्यवसायिक संस्थेच्या सचिवांनी यापूर्वी त्यांचे संस्थेस भोसले यांच्या मदतीने तलाव मंजूर करून घेतला होता.

तलावाच्या ठेक्यासाठी १५ हजारांची लाच घेताना मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी जाळ्यात
पुणे/लोणी काळभोर : मत्स्य व्यवसायासाठी तलावाच्या ठेक्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना हडपसर येथील मत्स्य व्यवसाय विकास केंद्रातील मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़.
जनक मल्हारी भोसले (वय ५४, रा़ सिद्धी, कुबेरा संकुल, हडपसर) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे़. एका मत्स्य व्यवसायिक संस्थेच्या सचिवांनी यापूर्वी त्यांचे संस्थेस भोसले यांच्या मदतीने तलाव मंजूर करून घेतला होता. हे काम करण्यासाठी त्यांनी २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली़ या तक्रारीची ६ मे रोजी पडताळणी केली, तेव्हा भोसले यांनी तडजोड करुन १५ हजार रुपये स्वीकारण्यास संमती दिली़. त्यानंतर मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हडपसर येथील मत्स्य व्यवसाय विकास केंद्रात सापळा रचला़ तक्रारदाराकडून १५ हजार रुपये घेताना जनक भोसले यांना पकडण्यात आले़. पोलीस अधीक्षक संदीप दिवाण व अप्पर पोलीस अधीक्षक दिलीप बोरस्ते यांचे मार्गदर्शनाखाली केली आहे.