आधी तरुणांना शोधायचा, मग त्यांच्याशी...  १० जणांची हत्या करणाऱ्या सीरियल किलरला अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 15:19 IST2024-12-24T15:19:32+5:302024-12-24T15:19:54+5:30

अटक केल्यानंतर सीरियल किलरने अनेक गुपिते उघड केली.

first searches for man then forms homosexual relationship, 10 killed serial killer in Rupnagar punjab | आधी तरुणांना शोधायचा, मग त्यांच्याशी...  १० जणांची हत्या करणाऱ्या सीरियल किलरला अटक!

आधी तरुणांना शोधायचा, मग त्यांच्याशी...  १० जणांची हत्या करणाऱ्या सीरियल किलरला अटक!

रुपनगर : आतापर्यंत तुम्ही सिरीयल किलर चित्रपटांमध्ये पाहिला असेल. मात्र, पंजाबमध्ये एका सिरीयल किलरची कहाणी समोर आली आहे, जी वाचल्यानंतर तुम्हाला धक्काच बसेल. पंजाबमधील रुपनगरमध्ये पोलिसांनी आतापर्यंत १० जणांची हत्या करणाऱ्या सीरियल किलरला अटक केली आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे सीरियल किलर पूर्वी तरुणांचा शोध घेत होता. या तरुणांचा शोध घेतल्यानंतर तो जबरदस्तीने त्यांच्याशी समलैंगिक संबंध ठेवायचा. यानंतर तो तरुणांकडे पैसे मागत होता. तरुणांनी पैसे दिले नाही, तर तो त्यांची हत्या करत होता. रुपनगर पोलिसांनी या गुन्हेगाराला सोमवार २३ डिसेंबर रोजी दुसऱ्या एका खुनाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पकडले आणि तपासादरम्यान असे आढळून आले की, या गुन्हेगारावर १० जणांच्या हत्येचा आरोप आहे.

अटक केल्यानंतर सीरियल किलरने अनेक गुपिते उघड केली. केशरी रंगाचे कपडे घालून आणि महिलांसारखा बुरखा घालून तो वेगवेगळ्या ठिकाणी तरुणांना आकर्षित करत त्यांची संबंध प्रस्थापित करत होता. त्यानंतर तो पैशाची मागणी करत होता. तसेच, यादरम्यान कोणी पैसे दिले नाही तर तो त्याला मारहाण करत होता. याशिवाय, त्यांची हत्या करत होता. या आरोपीकडे कोणतेही हत्यार नसून तो केवळ कपड्याने तरुणांची हत्या करत होता.

१० गुन्हांची कबुली
पोलीस तपासात आतापर्यंतच्या सर्व प्रकरणांमध्ये एक समान वैशिष्ट्य समोर आले आहे. ते म्हणजे जवळच पडलेल्या दगडाने किंवा काठीने हल्ला केल्यानंतर आरोपी आपल्या केशरी रंगाच्या कपड्याने गळा आवळून तरुणांची हत्या करत होता. रामस्वरूप असे आरोपीचे नाव आहे. पोलीस तपासात या सिरीयल किलरने आतापर्यंत ११ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

कुठे-कुठे केला गुन्हा?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन जिल्ह्यांत १० तरुणांच्या हत्या झाल्या आहेत. या सिरीयल किलरने पंजाबमधील फतेहगढ साहिब जिल्ह्यात चार, होशियारपूरमध्ये दोन, सरहिंद पटियाला रोडवर एक आणि रोपर जिल्ह्यात तीन हत्या केल्याची कबुली दिली आहे. यातील पाच घटनांची पोलिसांनी चौकशीही केली आहे. रोपर रुपनगरचे एसएसपी गुलनीत सिंह खुराना यांनी सांगितले की, आरोपीचा आधी शोध लागला नव्हता. नंतर आरोपीला पकडण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली. यानंतर हा सीरियल किलर पकडला गेला आहे.

Web Title: first searches for man then forms homosexual relationship, 10 killed serial killer in Rupnagar punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.