पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 09:07 IST2025-04-27T09:06:34+5:302025-04-27T09:07:22+5:30
Dmat Account Cyber Fraud: डीमॅट अकाऊंट असलेल्या कंपनी आणि सीडीएसएलकडे याची तक्रार केली परंतू, त्यांनी काहीही कारवाई केली नाही, अखेर पोलिसच त्याच्या मदतीला आले आहेत.

पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
आधी बँक अकाऊंट सुरक्षित नव्हती, आता डीमॅट अकाऊंटही सुरक्षित राहिलेली नाहीत. नोएडामध्ये एका व्यक्तीचे पाच लाख रुपयांचे शेअर्स रातोरात वळते करण्यात आले आहेत. दुसऱ्या दिवशी शेअर बाजार सुरु होताना जेव्हा त्याला समजले तेव्हा तो व्यक्ती शॉक झाला होता. त्याने डीमॅट अकाऊंट असलेल्या कंपनी आणि सीडीएसएलकडे याची तक्रार केली परंतू, त्यांनी काहीही कारवाई केली नाही, अखेर पोलिसच त्याच्या मदतीला आले आहेत.
नोएडा सेक्टर ११८ मध्ये राहणाऱ्या एका तरुणाच्या खात्यातून शेअर्स काढून घेण्यात आले आहेत. ते दुसऱ्या कोणत्यातरी खात्यात वळते करण्यात आले आहेत. रोहित नवानी असे या तरुणाचे नाव असून त्याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे डीसीपी सायबर प्रीती यादव यांनी सांगितले.
डीमॅट खाते कोणत्या वॉलेटला जोडलेले होते आणि ते शेअर्स कुठे वळते केले गेले याची माहिती घेतली जात आहे. २२ एप्रिलला त्याच्या खात्यातून हे शेअर वळते झाले आहेत. जवळपास ५०० शेअर होते. रात्री उशिरा त्याच्या डीमॅट खात्यातून हे शेअर वळते झाले आहेत. २२ एप्रिलला डीमॅट अकाऊंटवरून काही ओटीपी आले. हे ओटीपी मोबाईल नंबरवर नाहीतर मेल आयडीवर आले. याबरोबर त्याने सेंट्रल डिपॉजिटरी सर्विसेज लिमिटेड (CDSL) कडे तक्रार केली, डीमॅट खात्याच्या कंपनीकडेही तक्रार केली. परंतू त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मेल चेक केला तर त्यात रीड झालेले होते. डीमॅट अकाऊंट चेक केले तर त्यात शेअरची संख्या शून्य होती.
सायबर पोलीस काय म्हणतायत...
सायबर गुन्हेगारांनी आपली पद्धती बदलली आहे. पीडिताचा मोबाईल हॅक झाला आहे, त्याच्या मोबाईवर आलेले सर्व ओटीपी तिकडे जात आहेत. याद्वारे ठकांनी हे शेअर ट्रान्सफर केले आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच अशा प्रकारचा हा पहिलाच फ्रॉड असल्याचे ते म्हणत आहेत.