शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

डॉ. पायल आत्महत्याप्रकरणी पहिली अटक; आग्रीपाडा पोलिसांची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 5:45 PM

ही या प्रकरणात केलेली पहिलीच अटक आहे. 

ठळक मुद्देआग्रीपाडा पोलीस ठाण्यात तीन महिला डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखलकंटाळून पायलने टोकाचा निर्णय घेत गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुंबई - रॅगिंग करून डॉ. पायल तडवी हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तीन महिला डॉक्टरांविरुद्ध आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आज डॉ. भक्ती मेहेरला अटक करण्यात आली आहे. ही या प्रकरणात केलेली पहिलीच अटक आहे. 

तीन महिला सहकारी डॉक्टरांकडून होणाऱ्या रँगिंगला कंटाळून डॉ.पायल तडवी यांनी गळफास घेऊन नायर हॉस्पिटलच्या वसतिगृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक नुकतीच घटना घडली आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तीन महिला डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचे पडसाद संबंध महाराज्यात उमटले आहेत. नायर रुग्णालयाबाहेर आंदोलनं देखील करण्यात आली. याची दखल  राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी या आंदोलनस्थळी भेट दिली आणि आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती दिली होती. संबंध राज्यात होणारा उद्रेक पाहता पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत डॉ. भक्ती हिला बेड्या ठोकल्या आहे. याप्रकरणात अन्य दोन महिला डॉक्टर डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. हेमा आहुजा या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, या तिन्ही महिला डॉक्टरांनी कोर्टात अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनाचे अर्ज दाखल केले होते. उद्या या अटकपूर्व जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बीवायएल नायर हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या स्त्री रोग विभागात दुसऱ्या वर्षात (एम.डी) शिक्षण घेत असलेल्या डॉ.पायल तडवी यांना वरिष्ठ असलेल्या सहकारी डॉ. हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहेरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघांकडून मानसिक त्रास आणि अपमानित केले जात होते. याला कंटाळून पायलने टोकाचा निर्णय घेत गळफास घेऊन आत्महत्या केली. पायलचे फेब्रुवारी २०१६ साली सलमान तडवी यांच्या लग्न झाले. सलमान सध्या कूपर रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात. ते मूळचे भुसावळच्या रावेर येथील आहेत. पायलने यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात डॉक्टर म्हणून काम केले आहे. तीन महिला डॉक्टरांविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यातअ‍ॅट्रॉसिटी, रॅगिंगविरोधी कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

 

 

टॅग्स :payal tadvi suicideपायल तडवीPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरArrestअटक