firing on youth at day in the Daund | दौंडला युवकावर भरदिवसा गोळीबार
दौंडला युवकावर भरदिवसा गोळीबार

दौंड : दौंड शहरातील लिंगाळी हद्दीत एका युवकावर भरदिवसा गोळीबार झाल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना नेमकी कशामुळे झाली याचा उलघडा झालेला नाही. रोहित कांबळे (वय २७) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दौंड शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रोहित कांबळे (वय २७) हे आपल्या घरुन दुचाकीवरुन जात असताना त्यांच्या घराच्या पासून जवळच असलेल्या लिंगाळी रोडवर त्याच्यावर अज्ञात युवकाने दोन गोळ्या झाडल्या. 
दरम्यान जखमी अवस्थेत रक्तबंबाळ असताना ते दुचाकी चालवत शहरातील एका हॉस्पिटलजवळ गेले. त्यानंतर त्यांना पुणे येथे उपचारासाठी तातडीने पाठविण्यात आले असून त्यांची प्रकृती बरी असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.  दरम्यान गोळ्या  रिव्हॉल्वरमधून की गावठ्या कट्यातून झाडण्यात आल्या याचा उलघडा झाला नाही. 

Web Title: firing on youth at day in the Daund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.