शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

उरुळीत अज्ञात हल्लेखोरांकडून दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 21:33 IST

दुचाकी वाहनावरून सोलापूर महामार्गावरुन आलेल्या दोघा हल्लेखोरांनी दुकानाच्या दर्शनी भागासमोरून पंधरा फूट अंतरावरुन गावठी पिस्तुलातून गोळीबार केला.

उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली ) येथील तळवाडी चौकातील महात्मा गांधी विद्यालय रस्त्यावरील व्यापारीमल सावलदास या होलसेल कापड दुकानावर मंगळवारी (दि.१३) सायंकाळी पाऊणे सहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी गावठी पिस्तुलातून गोळीबार केला आहे. दुकानातील दर्शनी भागावर झालेल्या गोळीबारात दुकानासमोर मांडलेल्या शोभेच्या पुतळ्याला भेदून गोळी आरपार गेली आहे. त्यानंतर मुख्य गावातील नारायण मोबाईल शॉपी दुकानासमोर आणखी एक गोळी झाडत तिथून हल्लेखोर फरार झाले.या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. उरुळी कांचन मधील महात्मा गांधी विद्यालय रस्तावर व्यापारीमल सावलदास हे होलसेल कपड्याचे दालन आहे. मंगळवारी दुकानात नेहमीप्रमाणे नागरिकांची वर्दळ सुरू होती. दालनात सायंकाळी पाऊणे सहा वाजण्याच्या सुमारास दुचाकी वाहनावरून सोलापूर महामार्गावरुन आलेल्या दोघा हल्लेखोरांनी दुकानाच्या दर्शनी भागासमोरून पंधरा फूट अंतरावरुन गावठी पिस्तुलातून गोळीबार केला.हल्लेखोर हे २० ते २५ वर्ष वयोगटातील असून एकाने लाल रंगाचा शर्ट तर दुसऱ्याने काळ्या रंगाचा शर्ट घातल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आले आहे. ही गोेळीबाराची घटना घडल्यानंतर काहीवेळात लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील , सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. दरम्यान पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या तपासात उरुळी कांचन मधील पोलिसांच्या रेकॉर्डवरील दोघा सराईत गुन्हेगारांचा हल्लात सहभाग असल्याचे पुढे येत आहे.

                 

टॅग्स :Puneपुणेuruli kanchanउरुळी कांचनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस