शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोंढव्यात भावाचा जीव वाचविण्यासाठी गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 12:09 IST

दुचाकी चालकाबरोबर झालेल्या वादातून आपल्या भावाला आरोपी लोखंडी रॉडने मारहाण करत असल्याचे पाहून  वाचविण्यासाठी दुसऱ्या भावाने हवेत गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी (दि. ३० ) कोंढव्यात घडली. 

पुणे : दुचाकी चालकाबरोबर झालेल्या वादातून आपल्या भावाला आरोपी लोखंडी रॉडने मारहाण करत असल्याचे पाहून  वाचविण्यासाठी दुसऱ्या भावाने हवेत गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी (दि. ३० ) कोंढव्यात घडली. याप्रकरणी कोंढवापोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे़ सुफियान रफिक खान (वय ३३, रा़ कौसरबाग, कोंढवा), उबेद सईद खान (वय ३०, रा़ रविवार पेठ) आणि अब्दुला रजा शेख (वय २८, रा़ क्लाऊड नाईन सोसायटी, कोंढवा) अशी त्यांची नावे आहेत़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, अब्दुल दुराज गोरे (वय १९, रा़ कोंढवा) हा त्यांची मोटार घेवून शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता कोंढव्यातील कोणार्क पुरम सोसायटीजवळून जात होता़ सोसायटीमध्ये वळत असताना त्याच्या गाडीसमोर एक मोटारसायकलस्वार अचानक आल्याने त्याला गोरे यांनी थांबण्याचा इशारा केला. त्या कारणाने त्याने शिवीगाळ करत फिर्यादीला हातातील हेल्मेटने मारहाण केली़ त्यानंतर त्याच्या दोन साथीदारांना बोलावून घेतले व त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली़ मार चुकविण्यासाठी अब्दुला हे पळत सोसायटीत शिरले व पार्किंगजवळ केले़ आरोपीही त्यांचा पाठलाग करत त्यांच्याजवळ पोहचले़ त्याला लोखंडी रॉडने मारहाण करु लागले़ अब्दुला यांचा आरडाओरडा ऐकून त्यांचा चुलत भाऊ हसन समीर गोरे हा तिथे आला व तेव्हा अब्दुलाने मोठ्याने ओरडून भाई मेरे को बचाओ नही तो ये लोग मुझे मार डालेगे असे म्हणू लागला़ तेव्हा हसन याने त्याच्याकडील पिस्तुल काढले व उसको छोडे नही तो मुझे गोली चलाने पडेगी असे म्हणून पिस्तुलातून हवेत गोळीबार केला़ पिस्तुल पाहून आरोपी पळून गेले़ अब्दुला दुराज गोरे यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

टॅग्स :KondhvaकोंढवाPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारPoliceपोलिस