अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार; थोडक्यात बचावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 18:56 IST2022-04-24T15:17:13+5:302022-04-24T18:56:21+5:30
Firing on Builder : अंबरनाथ शहरातील बांधकाम व्यवसायिक कमरुद्दीन खान हे कोजगाव - कमलाकरनगर परिसरात असलेल्या मुकुल पाल्म सोसायटीच्या परिसरात असताना दोघा अज्ञात मारेकर्यांनी त्यांच्या दिशेने दोन राऊंड फायर करून पळ काढला.

अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार; थोडक्यात बचावला
अंबरनाथ: अंबरनाथच्या मुकुल पाल्म सोसायटीच्या परिसरात एका बांधकाम व्यावसायिकावर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केला आहे. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने या गोळीबारात बांधकाम व्यवसायिक सुखरूप बचावले आहेत.
अंबरनाथ शहरातील बांधकाम व्यवसायिक कमरुद्दीन खान हे कोजगाव - कमलाकरनगर परिसरात असलेल्या मुकुल पाल्म सोसायटीच्या परिसरात असताना दोघा अज्ञात मारेकर्यांनी त्यांच्या दिशेने दोन राऊंड फायर करून पळ काढला. खान यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी गोळीबार होतानाच स्वतःचा बचाव केला. त्यामुळे ते थोडक्यात या गोळीबारात बचावले आहेत.
अंबरनाथमध्ये एका बांधकाम व्यावसायिकावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात बांधकाम व्यावसायिक थोडक्यात बचावला असून याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केला आहे. pic.twitter.com/RYO5DK7dMI
— Lokmat (@lokmat) April 24, 2022
याच परिसरात एका सोसायटीच्या जागेवरून गेल्या काही वर्षांपासून खान यांचे दुसऱ्या एका बांधकाम व्यवसायिकासोबत वाद असल्याने त्या वादातून हा हल्ला घडविण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. नेमके हे मारेकरी कोण होते आणि त्यांना गोळीबार करण्यासाठी कोणी प्रवृत्त केले याचा पोलीस शोध घेत आहेत.
अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार pic.twitter.com/jMMkbWytfo
— Lokmat (@lokmat) April 24, 2022