खळबळजनक! पूर्ववैमनस्यातून दिवसाढवळ्या कुर्ल्यात गोळ्या घालून गुंडाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 16:25 IST2019-03-05T16:23:13+5:302019-03-05T16:25:00+5:30
मारेकऱ्यांची ओळख पटली असून विनोबा भावे नगर पोलिसांनी बिल्लाचा सावत्र भाऊ विनोद पवार याला ताब्यात घेतलं आहे.

खळबळजनक! पूर्ववैमनस्यातून दिवसाढवळ्या कुर्ल्यात गोळ्या घालून गुंडाची हत्या
ठळक मुद्देपूर्ववैमनस्यातून जानू पवार उर्फ बिल्ला या गुंडाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आज सकाळी ही घटना घडली असून त्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.बिल्लाने विनोदचा भाऊ दिपक पवार याची काही वर्षांपूर्वी हत्या केली होती.
मुंबई - कुर्लामधील हलवा पूल येथे पूर्ववैमनस्यातून जानू पवार उर्फ बिल्ला या गुंडाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आज सकाळी दिवसाढवळ्या ही घटना घडली असून त्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मारेकऱ्यांची ओळख पटली असून विनोबा भावे नगर पोलिसांनी बिल्लाचा सावत्र भाऊ विनोद पवार याला ताब्यात घेतलं आहे.