शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डिजीपीनगरला गोळीबार; सराईत गुन्हेगार जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 02:00 IST

उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील डीजीपीनगर वसाहत रात्री झालेल्या गोळीबाराने हादरली.

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील डीजीपीनगर क्रमांक एक परिसरातील टागोरनगरच्या कॉर्नरवर अज्ञात दुचाकीस्वार हल्लेखोरांनी शनिवारी (दि.19) रात्री अकरा वाजेच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत सिन्नरफाटा येथील सराईत गुन्हेगार बाबा शेख हा जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील डीजीपीनगर वसाहत रात्री झालेल्या गोळीबाराने हादरली. नाशिकरोड बाजूकडून डीजीपी नगरमार्गे जाणाऱ्या बाबा वर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला या गोळीबारात त्याच्या डाव्या बरगडीला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळीबारानंतर हल्लेखोर वडाळागावाच्या दिशेने  पसार झाल्याचे काही नागरिकांनी सांगितले. दरम्यान या हल्लेखोरांनी दहशत माजविण्यासाठी पुन्हा डिजीपीनगरच्या जॉगिंग ट्रॅकलगतच्या गतिरोधकाच्या परिसरात हवेत गोळीबार केल्याची चर्चा आहे. दोन दुचाकींवरून हल्लेखोर हातात गावठी पिस्तुल घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्नात होते.  

घटनेची माहिती मिळताच तात्काळ उपआयुक्त विजय खरात, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत पडलेल्या बाबाला तात्काळ एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. काही हल्लेखोरांनी ओळख पटली असून त्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याच परिसरात महापौर सतीश कुलकर्णी यांचेही निवास्थान आहे. डिजीपीनगर ही सेवानिवृत्त जिल्हा परिषद कर्मचारी वर्गाची सर्वात जुनी गृहनिर्माण वसाहत म्हणून ओळखली जाते.

टॅग्स :FiringगोळीबारNashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliceपोलिस