शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

एसीपी दिपक फटांगरे आणि आयपीएस अधिकारी देवेन भारतींवर एफआयआर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 12:31 IST

Crime News : मालवणी पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई - घुसखोर बांग्लादेशी महिलेला अनधिकृतपणे भारतात प्रवेश करण्यासाठी पासपोर्ट बनवून देण्यात आला. याप्रकरणी  तत्कालीन तक्रारदार निवृत्त पोलीस निरीक्षक दिपक कुरुळकर यांनी तक्रार देऊनही वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सध्या एसीपी असलेले दिपक फटांगरे आणि तत्कालीन सहपोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) देवेन भारती यांनी तक्रार दाखल करून घेतली नाही असा आरोप असून याप्रकरणी गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (सीआययु) ने मालवणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. 

तक्रारदार कुरुळकर यांनी केलेल्या आरोपानुसार, घुसखोर बांग्लादेशी महिला आरोपी रेश्मा खान हिने अनधिकृतरीत्या व योग्य त्या कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश करून अन्य साथीदारांच्या संगनमताने बनावट कागदपत्रे बनवून भारताचा पासपोर्ट तयार केला. त्याप्रकरणी कुरुळकर यांनी तक्रार देऊनही आरोपी फटांगरे आणि भारती यांनी तक्रार दाखल केली नाही. तसेच तक्रार दाखल न करण्यासाठी कुरुळकर यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक ( सीआययु ) चे पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार सीआययु याप्रकरणी अधीक तपास करत आहे.

 

दरम्यान याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर भालेराव यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्याचे टाळले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४३६/२०२१ हा  भारतीय दंडविधान संहिता कलम ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४२० आणि ३४ तसेच कलम १२ (१-अ) (अ) आणि (ब) भारतीय पारपत्र अधिनियम १९६७ सह नियम क्रमांक  ३,६ पारपत्र(भारतामध्ये प्रवेश करण्याबाबत नियम) १९५०, सह कलम ३ पारपत्रान्वये भारतामध्ये प्रवेश करण्याबाबत अधिनियम १९२० सह कलम ३(१) विदेशी नागरीकाबाबतचा अध्यादेश १९४८ सह कलम १३,१४ (अ) (ब) विदेशी नागरीकाबाबत अधिनियम १९४६ अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस