क्रूरतेचा कळस! कुत्र्याला मरेपर्यंत मारणाऱ्या वॉचमनविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 06:52 PM2019-11-20T18:52:22+5:302019-11-20T18:56:17+5:30

वॉचमनविरोधात जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FIR Filed against watchman who killed a dog | क्रूरतेचा कळस! कुत्र्याला मरेपर्यंत मारणाऱ्या वॉचमनविरोधात गुन्हा दाखल

क्रूरतेचा कळस! कुत्र्याला मरेपर्यंत मारणाऱ्या वॉचमनविरोधात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्दे पायानं अधू झालेल्या आणि खंगलेल्या भटक्या कुत्र्याला एका सोसायटीतील वॉचमननं निर्घृण मारल्याची घटनाविलेपार्ले येथे ही शिवम सोसायटी येथे घडली आहे. या वॉचमनचं नाव एन. ठाकूर असं आहे. 

मुंबई - अपंग आणि खंगलेल्या भटक्या कुत्र्याला मरेपर्यंत मारणाऱ्या सोसायटीच्या वॉचमनविरोधात जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पायानं अधू झालेल्या आणि खंगलेल्या भटक्या कुत्र्याला एका सोसायटीतील वॉचमननं निर्घृण मारल्याची घटना विलेपार्ले येथे ही शिवम सोसायटी येथे घडली आहे. सोसायटीतील एका सामाजिक कार्यकर्त्याने या प्रकरणी पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सोसायटीच्या वॉचमनविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या वॉचमनचं नाव एन. ठाकूर असं आहे. 

विलेपार्ले पश्चिमेकडील शिवम सोसायटीच्या परिसरात खंगलेल्या आणि एका पायाने अपंग असलेला एक कुत्रा जळजवळ वर्षभरापासून भटकताना दिसत होता. या सोसायटीचा वॉचमन एन. ठाकूर यानं या भटक्या कुत्र्याला मरेपर्यंत क्रूरपणे मारहाण केली. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते मितुल प्रदीप यांनी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी वॉचमनविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सोसायटीचा वॉचमन असलेल्या एन. ठाकूरविरोधात मितुल प्रदीपने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या भटक्या कुत्र्याला ठाकूरने क्रूरपणे मारहाण केली होती. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी संगीतकार उदय मुजुमदार यांनीही ही घटना पाहिली होती. मी त्यांच्यासोबतच जुहू पोलीस ठाण्यात जाऊन वॉचमनविरोधात तक्रार दाखल केली असल्याची माहिती मितुल प्रदीप हिने दिली. मितुल ही कवी प्रदीप यांची मुलगी आहे. या कुत्र्याला लंगडू नावाने ओळखायचे. काही दिवसांपूर्वीची ही घटना आहे. एका दिवशी रात्री वॉचमन या कुत्र्याला मारत असल्याचे आम्ही पाहिलं. मी इमारतीतून खाली उतरलो आणि त्याच्या तावडीतून कुत्र्याची सुटका केली. नंतर त्याला पशूवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, दुर्दैवानं एका आठवड्यापूर्वी कुत्र्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आम्ही वॉचमनविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली अशी माहिती मुजुमदार यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी ठाकूरविरोधात प्रिवेंशन ऑफ क्रुएल्टी अ‍ॅक्टच्या काही कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

Web Title: FIR Filed against watchman who killed a dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.