मिलिंद सोमण यांच्या विरोधात कोलवा पोलीस ठाण्यात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 23:50 IST2020-11-06T23:50:17+5:302020-11-06T23:50:51+5:30

Milind Soman : मिलिंद सोमण यांच्याविरूद्ध कोलवा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FIR against Milind Soman at Kolwa Police Station | मिलिंद सोमण यांच्या विरोधात कोलवा पोलीस ठाण्यात गुन्हा

मिलिंद सोमण यांच्या विरोधात कोलवा पोलीस ठाण्यात गुन्हा

मडगाव : गेल्या दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री पूनम पांडे हिच्याविरुद्ध अश्लील व्हिडीओ प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. यानंतर आता मॉडेल मिलिंद सोमण यांच्याविरूद्ध कोलवा पोलीस ठाण्यात असाच गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे.

मिलिंद सोमण यांनी आपल्या ५५ व्या वाढदिवशी सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर एक स्वत:चा विवस्त्रावस्थेत धावतानाचा फोटो अपलोड केला होता. त्यांचा हा फोटो गोव्यातील वार्का समुद्रकिनारी काढण्यात आला होता.

दरम्यान, याप्रकरणी मिलिंद सोमण यांच्या विरुद्ध भादंसंच्या २९४ व आयटी कायद्याच्या ६७ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: FIR against Milind Soman at Kolwa Police Station