शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबाद पोलिसांची मुंबईत कारवाई, अमित शाह यांचा फोटो ट्वीट करणाऱ्या फिल्ममेकरला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 18:51 IST

दास यांची पुढील चौकशी अहमदाबादमध्ये होणार असल्याची माहिती

अहमदाबाद: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा अटकेत असलेल्या केलेल्या IAS अधिकारी पूजा सिंघलसोबत फोटो शेअर केल्या प्रकरणी गुजरात पोलिसांनी मंगळवारी चित्रपट निर्माते अविनाश दास यांना मुंबईतून ताब्यात घेतले. गुजरात पोलिसांच्या अहमदाबाद गुन्हे शाखेने ही कारवाई केली. काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचारांच्या आरोपाखाली IAS अधिकारी पूजा सिंघल यांना अटक करण्यात आली होती. त्या पूजा सिंघल आणि अमित शाह यांचा एकत्र असलेला एक फोटो दास यांनी ट्वीट केला होता. त्यामुळे अमित शाह यांची प्रतिमा मलिन करण्याच्या आरोपाखाली दास यांना मुंबईतून अटक करण्यात आली. तसेच दास यांनी एका महिलेचा तिरंगा परिधान केलेला एक आक्षेपार्ह फोटोदेखील शेअर केला होता. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अहमदाबाद गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त डी पी चुडासामा म्हणाले, "आम्ही दास यांना मंगळवारी मुंबईतून ताब्यात घेतले आहे. आता पुढील कायदेशीर प्रक्रिया व चौकशी अहमदाबादमध्ये केली जाईल." अहमदाबाद गुन्हे शाखेने मुंबईस्थित चित्रपट निर्माते दास यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४६९ अन्वये तसेच राष्ट्रीय सन्मानचिन्हांचा अपमान प्रतिबंधक कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींनुसार FIR नोंदविला होता. दास यांनी तिरंगा परिधान केलेल्या एका महिलेचा आक्षेपार्ह फोटोदेखील पोस्ट केला होता. Instagram आणि Facebook दोनही अकाऊंटवर हा फोटो केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

४६ वर्षांचे अविनाश दास यांच्याविरुद्ध जूनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला होता. मनी लॉड्रींग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अधिकारी पूजा सिंघल या अमित शाह यांच्यात कानाजवळ काही तरी सांगत असल्याचा फोटो त्यांनी पोस्ट केला होता. अमित शाह आणि पूजा सिंघल यांचा तो फोटो सिंघल यांना अटक होण्याच्या काही वेळापूर्वीचा असल्याचा दावा अविनाश दास यांनी ट्वीटमध्ये केला होता. पण तो फोटो मात्र २०१७ मधील होता.  त्यामुळे शाह यांची प्रतिम मलिन करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहCrime Newsगुन्हेगारीbollywoodबॉलिवूडTwitterट्विटर