मुंबई - Whats App व्हिडिओ कॉलवर चाकूने स्वतःचे बरेवाईट करून घेण्याचा धाक दाखवत प्रेयसीला विवस्त्र व्हायला सांगत अश्लील चित्रण करुन पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार मालाडमध्ये उघडकीस आला. याप्रकरणी कुरार पोलिसांनी संजय लाला ओव्हळ (२९) नामक तरुणावर गुन्हा दाखल करत उस्मानाबाद मधून अटक केली आहे.उस्मानाबादला राहणाऱ्या ओव्हळवर सदर तरुणीचे प्रेमसंबंध होते. २०१९ मध्ये त्यांनी लग्न करण्याचेही ठरविले. याच दरम्यान त्याने तरुणीला व्हिडीओ कॉल करत कपडे काढून चॅट करायला सांगितले ज्याला तिने नकार दिला. तेव्हा दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा तिला फोन करत तिने विवस्त्र होत चॅटिंग नाही केलं तर तो स्वतःला संपवेल अशी धमकी दिली. तेव्हा घाबरून तिने त्याचे म्हणणे ऐकले. मात्र ओव्हळने तिचे अश्लील फोटो काढत नंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून अद्याप ५८ हजार रुपये उकळले. अखेर कंटाळून तिने याची तक्रार कुरार पोलिसांना केली आणि त्याचा गाशा गुंडाळण्यात आला.