निगडीत ४३ लाखांची फसवणूक ; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 15:42 IST2019-02-03T15:41:14+5:302019-02-03T15:42:49+5:30
पुर्वकल्पना न देता फिर्यादीने गुंतवणूक केलेली रक्कम आरोपींनी परस्पर काढून घेतली.

निगडीत ४३ लाखांची फसवणूक ; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी : भागीदारीत व्यवसाय करण्याचे सांगून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. पुर्वकल्पना न देता फिर्यादीने गुंतवणूक केलेली रक्कम आरोपींनी परस्पर काढून घेतली. सुमारे ४३ लाखांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी निगडी पोलिसांकडे शनिवारी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सवाराम देवासी, चैनी देवासी, योगेश देशमुख, स्मिता देशमुख या आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्लोबल फार्मच्या बँक खात्यावर फिर्यादी महिलेने रक्कम जमा केली होती. बनावट कागदपत्र तयार करून फिर्यादीची दिशाभूल केली. गुंतवणूक केलेले ४३ हजार ३९ हजार रुपये आरोपींनी परत केले नाहीत. विश्वासघात केला. बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.