शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

कडवविरुद्ध बजाजनगरात पुन्हा एक गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 22:04 IST

पारशिवनीच्या एका व्यक्तीला सदनिका देतो अशी थाप मारून मंगेश कडव याने २५ लाख रुपये घेतले आणि सदनिका न देता त्यांना धमकी देऊन त्यांची फसवणूक केली. आज या संबंधाने बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देसदनिका देतो म्हणून फसविले : २५ लाख रुपये हडपले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पारशिवनीच्या एका व्यक्तीला सदनिका देतो अशी थाप मारून मंगेश कडव याने २५ लाख रुपये घेतले आणि सदनिका न देता त्यांना धमकी देऊन त्यांची फसवणूक केली. आज या संबंधाने बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.कुख्यात कडव यांनी राजकीय पद, नोकरी, कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केलेली आहे.त्यामुळे त्याची कुंडली बाहेर काढली आहे. कडव विरुद्ध मालमत्ता बळकावणे, खंडणी वसूलणे असेही अनेक गंभीर आरोप आहेत. त्यामुळे त्याचा कसून तपास सुरू आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली कडवचा तपास सुरू आहे. या तपासात पोलीस उपायुक्त राजमाने स्वत: विशेष लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे कधी नव्हे एवढ्या तक्रारी आणि प्रकरण पोलिसांना मिळाली आहेत. कडवच्या पापाचा घडा पोलिसांनी फोडल्याचे लक्षात आल्यामुळे ठिकठिकाणचे पीडित तक्रारी दाखल करण्यासाठी गुन्हे शाखेत येत आहेत. पारशिवनीचे अजय बाबाराव शेंदरे यांनीही दोन दिवसापूर्वी उपायुक्त राजमाने यांची भेट घेऊन त्यांना आपली कैफियत सांगितली. मंगेश कडवने बजाजनगरमध्ये सदनिका देतो, अशी थाप मारून आपल्या कडून २५ लाख रुपये घेतले होते. आता दीड- दोन वर्षे झाले तरी त्याने ही सदनिका दिली नाही आणि आपली रक्कमही परत केली नाही. तो आपल्याला स्वत: आणि गुंडामार्फत जीवे मारण्याच्या धमक्या देतो, असेही ही शेंदरे यांनी सांगितले. त्यांच्याकडे असलेले पुरावे लक्षात घेऊन उपायुक्त राजमाने यांनी बजाजनगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शनिवारी सायंकाळी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.दोन पोती फाईल मिळाल्याकुख्यात कडवच्या भरतनगरातील कार्यालयाची पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे दोन पोती भरेल इतकी कागदपत्रे मिळाली. त्यात मालमत्तेचे मजकूर लिहिलेल्या अनेक फाईल्स आहेत. कोरे स्टॅम्प, चेक आणि वेगवेगळ्या व्यक्तीकडून नोकरीसाठी लिहून घेतलेल्या अर्जाचाही यामध्ये समावेश आहे.सहावा गुन्हाबजाजनगरचा दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे आता कडवविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या सहा झाली आहे. यापूर्वी त्याच्याविरुद्ध अंबाझरी, सक्करदरा, बजाजनगर, सीताबर्डी आणि हुडकेश्वरमध्ये वेगवेगळे पाच गुन्हे दाखल झालेले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी