मृत्यूशी झुंज सुरूय, हुंड्यासाठी सासरच्यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 21:42 IST2021-01-01T21:40:53+5:302021-01-01T21:42:23+5:30
Dowry Case : तन्वी नावाच्या महिलेला तिच्या पती, सासू आणि सासऱ्याने हुंड्यासाठी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा तनवीच्या कुटुंबियांचा आरोप आहे.

मृत्यूशी झुंज सुरूय, हुंड्यासाठी सासरच्यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पुन्हा एकदा हुंड्याचे प्रकरण समोर आले आहे. उत्तर दिल्लीच्या रुप नगर पोलीस ठाण्याअंतर्गत एक धक्कादायक घटना घडली. तन्वी नावाच्या महिलेला तिच्या पती, सासू आणि सासऱ्याने हुंड्यासाठी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा तन्वीच्या कुटुंबियांचा आरोप आहे.
तन्वीच्या कुटुंबियांचे असे मत आहे की, तनवीचा पती आणि सासू-सासरे नेहमीच तिला हुंड्यासाठी तिचा छळ करत होते. त्यांनी शनिवारी तन्वीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात तनवी मृत्यूला झुंज देत आहे. तन्वीची आई सुनीता बेनीवाल सांगतात की, मुलाचे लग्न करावे लागेल, त्यासाठी त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले." तनवीला तिच्या माहेरून तिचा हिस्सा घेण्यास सांगितले. मी सेवानिवृत्त आहे, त्यामुळे मी पैसे दिलेला नाही. त्यापासून माझ्या मुलीला त्यांनी त्रास देणं सुरु केलं आहे.
आम्हाला १०. १० वाजता रुपनगर पोलीस ठाण्यातून फोन आला की, तुमच्या मुलची प्रकृती गंभीर आहे. तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला उशिरा कळवण्यात आलं. तिला ८ वाजताच रुग्णालयात आणण्यात आलं होतं. पूर्ण कुटुंबाने मिळून तिला बेदम मारहाण केली.तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर मारहाणीच्या जखमा आहेत, असे तनवीचे वडील विशंभर दयाळ यांनी सांगितले. २००८ मध्ये मध्ये तन्वीचे लग्न अभिषेक नावाच्या व्यक्तीशी झालं. तिचा नवरा उत्तर दिल्लीच्या नगरपालिकेच्या नरेला झोनमध्ये जेई आहे. तनवीच्या कुटुंबाचा आरोप आहे की हुंड्यासाठी तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती tv९ने दिली आहे.