शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

आमदाराच्या घराचे आमिष दाखवून पन्नास लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 2:53 AM

आमदारांसाठी म्हाडामार्फत उभारण्यात आलेल्या वर्सोवा-लोखंडवाला येथील एका इमारतीतील घर मिळवून देण्याच्या बहाण्याने एका दलाल महिलेने जुहूतील एका महिलेला पन्नास लाखांचा गंडा घातला आहे.

मुंबई - आमदारांसाठी म्हाडामार्फत उभारण्यात आलेल्या वर्सोवा-लोखंडवाला येथील एका इमारतीतील घर मिळवून देण्याच्या बहाण्याने एका दलाल महिलेने जुहूतील एका महिलेला पन्नास लाखांचा गंडा घातला आहे. फसवणूक झालेल्या या महिलेने खेरवाडी पोलीस ठाणे आणि म्हाडाच्या दक्षता विभागाकडे धाव घेतली आहे.सांताक्रूझ पश्चिमेमध्ये रूपल जैन यांच्या मालकीचे स्पा अ‍ॅण्ड सलून आहे. या सलूनमध्ये पौर्णिमा पेंडके नियमित येत होत्या. यामुळे रूपल आणि पौर्णिमा यांच्यामध्ये मैत्री जमली. पौर्णिमा यांनी रूपल यांना लोखंडवाला येथील म्हाडाचे घर स्वस्तात मिळवून देण्याचे कबूल केले. पौर्णिमा यांनी रूपल यांचा विश्वास संपादन करण्यासाठी लोखंडवाला येथील राजयोग सोसायटीतील पंधराव्या मजल्यावरील घर दाखवले. या ठिकाणी एका व्यक्तीला बोलावून तो म्हाडाचा मोठा अधिकारी असल्याचे भासवण्यात आले. आमदारांना पैशांची गरज असल्याने ते हा फ्लॅट स्वस्तात विकत असल्याचे पौर्णिमा यांनी सांगितल्याची माहिती रूपल यांनी दिली.पौर्णिमा यांनी त्यांच्याकडे म्हाडाचे लायसन्स असून म्हाडाचे अनेक अधिकारी चांगल्या ओळखीचे असल्याचे रूपल यांना सांगितले. स्वस्तातील घरासाठी पौर्णिमा यांना साठ लाख रुपये देण्याचे कबूल केल्याचे रूपल यांनी सांगितले. यानुसार पहिल्यांदा तीस लाख आणि दुसऱ्या वेळेस वीस लाख देण्यात आले. मात्र अनेक महिने घराची चावी न मिळाल्याने तगादा लावल्यानंतर पौर्णिमा यांनी मी सर्व पैसे म्हाडा अधिकाऱ्यांना दिले असून त्यांनी दिल्यावर पैसे परत करण्यात येतील, असे पेंडके यांनी सांगितल्याचे रूपल यांनी सांगितले. वारंवार विचारणा केल्यावर २७, २९ आणि ३० मार्चला बँक आॅफ महाराष्ट्रचे धनादेश देण्यात आले. मात्र ते न वटल्याने पुन्हा मागणी केली असता दम भरण्यात आल्याचे रूपल यांनी सांगितले. तसेच म्हाडा अधिकारी, मंत्रालय, मुख्यमंत्री आणि अनेक पोलीस अधिकारी यांच्याशी आपली ओळख असल्याची धमकी पेंडके यांनी द्यायला सुरुवात केली़मुख्यमंत्र्यांशी ओळख असल्याची धमकीवारंवार विचारणा केल्यावर २७, २९ आणि ३० मार्चला बँक आॅफ महाराष्ट्रचे धनादेश देण्यात आले. मात्र ते न वटल्याने पुन्हा मागणी केली असता दम भरण्यात आल्याचे रूपल यांनी सांगितले. तसेच म्हाडा अधिकारी, मंत्रालय, मुख्यमंत्री आणि अनेक पोलीस अधिकारी यांच्याशी आपली ओळख असल्याची धमकी पेंडके यांनी द्यायला सुरुवात केल्याचे रूपल यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी