Sai shakti building slab collapse: उल्हासनगरात इमारतीचा पाचव्या मजल्यावरील स्लॅब थेट तळमजल्यावर कोसळला; 7 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 23:11 IST2021-05-28T22:57:04+5:302021-05-28T23:11:21+5:30
Major accident in Ulhasnagar: उल्हासनगरमध्ये रात्री 10 च्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. अद्याप ३ ते ४ व्यक्ती इमारतीमध्ये अडकल्या असून उल्हासनगर अग्निशामक दलाकडून बचावकार्य सुरू आहे.

Sai shakti building slab collapse: उल्हासनगरात इमारतीचा पाचव्या मजल्यावरील स्लॅब थेट तळमजल्यावर कोसळला; 7 जणांचा मृत्यू
उल्हासनगरमध्ये रात्री 10 च्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. पाचव्या मजल्यावरील एका सदनिकेचा पाचव्या मजल्या पासून पहिल्या मजल्या पर्यंतचा स्लॅब तळ मजल्यावर कोसळला आहे. घटनेची माहिती कळताच ठाणे महानगरपालिकेची TDRF टीम घटनास्थळी पोहोचत आहे. तोपर्य़त पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी काही प्रमाणात ढिगारा हटविला असून त्यातून सात जणांचे मृतदेह बाहेर काढले. (Sai shakti building slab collapse in Ulhasnagar.)
कॅम्प २ मधील साई शक्ती इमारतीत ही दुर्घटना घडली. या इमारतीमध्ये पाच मजले (तळ+5) आहेत. घटनास्थळी उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान व पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिकेसह उपस्थित आहेत. सुरुवातीला ५ व्यक्तींचे मृतदेह सापडले होते तर ३ ते ४ व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या. उल्हासनगर अग्निशामक केंद्राकडून बचावकार्य सुरू आहे. सहायक आयुक्त गणेश शिंपी, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी असून जखमींना उपचारासाठी नेण्यात येत आहे.
5 people died after the slab of a residential building collapsed in Ulhasnagar of Thane district. 3-4 people feared trapped. Rescue operation is underway: Thane Municipal Corporation
— ANI (@ANI) May 28, 2021
#Maharashtrapic.twitter.com/DmDGzEL3FX
उल्हासनगरात १५ दिवसांपूर्वी मोहिनी इमारतींचा स्लॅब कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला होता. १० जण जखमी झाले होते. त्यानंतर दोन दिवसांत पुन्हा दोन इमारतीचे स्लॅब व प्लॅस्टर पडल्याने, इमारती सील केल्या आहेत. इमारत पडल्याची घटना नवीन असताना कॅम्प नं-२ परिसरातील साई शक्ती इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजता घडली. स्लॅबचा ढिगारा काढण्यात येत असून आतापर्यंत ७ जणांचे मृतदेह काढण्यात आले. इमारस्ती मध्ये एकून २९ फ्लॅट असून यातील रहिवाशांची राहण्याची व्यवस्था थारासिंग दरबार येथे करण्यात येत आहे. परिसरात वीज पुरवठा खंडीत झाल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले. अश्या परिस्थितीत अग्निशमन दलाचे जवान, पोलीस व महापालिका कर्मचारी नागरिकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढत आहेत.
इमारतीमध्ये अडकलेल्या व्यक्तीचा शोधकार्य सुरू आहे. जखमी व्यक्तीला मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
*जखमी व्यक्तीचे नावे खालीलप्रमाणे:*
१) अलगोत नायडर ( पु/ वय ६० वर्ष)
२) नाव माहीत नाही
*मृत व्यक्तीचे नाव खालीलप्रमाणे.*
१)पुनीत बजोमल चांदवाणी (पु/वय १७ वर्ष)
२ ) दिनेश बजोमल चांदवाणी (पु/वय ४० वर्ष)
३) दीपक बजोमल चांदवाणी (पु/वय ४२ वर्ष)
४) मोहिनी बजोमल चांदवाणी (स्त्री /वय ६५ वर्ष)
५) कृष्णा इनूचंद बजाज (पु/वय २४ वर्ष)
६) अमृता इनूचंद बजाज (स्त्री /वय ५४ वर्ष)
७) लवली बजाज