शेतातील पाण्याचा वाद पेटला; शेतकऱ्याने दारूच्या नशेत केला भावाचा खात्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 06:40 PM2019-12-10T18:40:52+5:302019-12-10T18:44:02+5:30

दारूच्या नशेत शेतकऱ्याने केले विळ्याने वार

A field water dispute arose; drunk Farmer killed brother in Hadgaon | शेतातील पाण्याचा वाद पेटला; शेतकऱ्याने दारूच्या नशेत केला भावाचा खात्मा

शेतातील पाण्याचा वाद पेटला; शेतकऱ्याने दारूच्या नशेत केला भावाचा खात्मा

Next
ठळक मुद्देशेतीच्या पाणीपाळी वरून झाला होता वाद

हदगाव : शेतातील पाण्याचा वाद उफाळून आल्याने एका शेतकऱ्याने त्याच्या चुलत भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.१० ) दुपारी तालुक्यातील निवळा या गावात उघडकीस आली. अमोल नागोराव कोकाटे असे मृताचे नाव असून आरोपी भाऊ  गजानन बापुराव कोकाटे यास अटक करण्यात आलेली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, अमोल नागोराव कोकाटे व गजानन बापुराव कोकाटे हे चुलत भाऊ शेती करतात. सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. शेतात हरबरा पिकाची पेरणी सुरू आहे. दरम्यान अमोल आणि गजानन मध्ये शेतातील पाण्याचा वाद उफाळून आला. शेतात पाणीपाळी देण्यावरून त्यांच्यात खडाजंगी झाली. यातूनच गजाननने हातातील विळ्याने अमोलवर सपासप वार केले. यात अमोलचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी गजानन कोकाटे याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अवद्युत कुशे करत आहेत.

Web Title: A field water dispute arose; drunk Farmer killed brother in Hadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.