'स्त्री फेम' फ्लोरा सैनीची विकासकाने केली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 20:32 IST2018-12-18T20:29:27+5:302018-12-18T20:32:03+5:30

याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे (इओडब्ल्यू) अभिनेत्रीने गुन्हा दाखल केला असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

'Female Fame' Flora Saini looted lakh rupee by developer | 'स्त्री फेम' फ्लोरा सैनीची विकासकाने केली फसवणूक

'स्त्री फेम' फ्लोरा सैनीची विकासकाने केली फसवणूक

ठळक मुद्देएका विकासकाने फ्लॅट आणि व्यावसायिक गाळा देण्याच्या नावाखाली ५ लाख ३१ हजारांची फसवणूक केली.फ्लोराने ५ लाख ३१ हजारांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला.काही दिवसांनी या बांधकाम व्यावसायिकाने ही रहिवाशी इमारत असून दुकान देता येणार नसल्याचे सांगितले

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आणि 'स्त्री फेम' फ्लोरा सैनीला एका विकासकाने फ्लॅट आणि व्यावसायिक गाळा देण्याच्या नावाखाली ५ लाख ३१ हजारांची फसवणूक केली. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे (इओडब्ल्यू) अभिनेत्रीने गुन्हा दाखल केला असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
कमला लॅण्डमार्क ग्रुप असं फसवणूक केलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या कंपनीचे नांव आहे. स्त्री फेम अभिनेत्री फ्लोरा सैनीला फ्लॅट आणि व्यावसायिक गाळा हवा होता. यासाठी ती अनेक ठिकाणी चौकशी करत होती. दरम्यान कांदिवली परिसरात कमला लॅण्डमार्क ग्रुपचा एक प्रोजेक्ट सुरु असल्याने त्यांनी या अभिनेत्रीला फ्लॅट अणि दुकान देण्याचे मान्य केले. त्यानुसार, फ्लोराने ५ लाख ३१ हजारांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. मात्र, काही दिवसांनी या बांधकाम व्यावसायिकाने ही रहिवाशी इमारत असून दुकान देता येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे फ्लोराने गुंतवलेले पैसे परत मागितले. यावेळी काही दिवसांनी पैसे देऊ असे या बांधकाम व्यावसायिकाने सांगितले. मात्र, अनेक दिवस झाल्यानंतर देखील पैसे परत न केल्याने अखेर फ्लोराने इओडब्ल्युकडे गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.   

 

Web Title: 'Female Fame' Flora Saini looted lakh rupee by developer