Instagram वरील मैत्रिणीवर प्रेम जडलं; युवकाने प्रेमाआड येणाऱ्या बापालाच संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 13:56 IST2023-06-24T13:55:59+5:302023-06-24T13:56:23+5:30

आरोपी युवकाने वडिलांच्या खात्यावरून तिनदा २८ हजार रुपये काढले होते. बँक खात्यातून पैसे काढल्याचं कळताच वडील प्रल्हाद यांनी मुलगा पुष्पेंद्रला विचारणा केली.

fell in love with a friend on Instagram; son killed his father who is against love marriage in palwal | Instagram वरील मैत्रिणीवर प्रेम जडलं; युवकाने प्रेमाआड येणाऱ्या बापालाच संपवलं

Instagram वरील मैत्रिणीवर प्रेम जडलं; युवकाने प्रेमाआड येणाऱ्या बापालाच संपवलं

पलवल - हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील घरौट गावात झालेल्या प्रल्हाद हत्याकांडात पोलिसांनी मुलगा पुष्पेंद्रला अटक करून १ दिवसीय पोलिस कोठडीत घेतले आहे. हत्येच्या दिवशी घडलेल्या घटनाक्रमावरून पोलिसांनी आरोपीची चौकशी केली. त्यावेळी खाकी वर्दीचा धाक दाखवताच आरोपीने त्याचा गुन्हा पोलिसांसमोर कबुल केला. हत्येनंतर धारदार शस्त्राने त्याने स्वत:लाही मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून पोलिसांनी त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हाही दाखल केला आहे. 

पंजाबच्या मुलीशी करायचं होतं लग्न
तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी आरोपी पुष्पेंद्रची इन्स्टाग्रामवर पंजाबच्या लुधियाना इथं राहणाऱ्या युवतीशी मैत्री झाली. या मैत्रीचे पुढे जाऊन प्रेमात रुपांतर झाले. या युवतीला भेटण्यासाठी युवक लुधियानाला गेला होता. लुधियानाला जाण्यासाठी त्याने कर्ज काढून पैसे खर्च केले. आरोपीने युवतीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या कुटुंबाला सांगितले. कुटुंबातील काही सदस्यांनी दबावाखातीर लग्नाला परवानगी दिली परंतु वडील प्रल्हाद यांनी लग्नास नकार दिला. 

हत्या करून मृतदेह कपड्यांनी झाकला 
आरोपी युवकाने वडिलांच्या खात्यावरून तिनदा २८ हजार रुपये काढले होते. बँक खात्यातून पैसे काढल्याचं कळताच वडील प्रल्हाद यांनी मुलगा पुष्पेंद्रला विचारणा केली. मुलाची उडवाउडवीची उत्तरे पाहून वडिलांनी पोलीस ठाण्यात रिपोर्ट करू असं सांगितले. याबाबत कुठलीही तक्रार पोलिसांनी दिली नाही. या सर्व घटनांमुळे संतापलेल्या युवकाने घरातून बाहेर पडत शेताकडे गेला. तिथे झोपलेल्या बापावर वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेह कपड्याने झाकून मुलगा घरी येऊन झोपी गेला. 

प्रल्दाह यांचा शेतात खून झाल्याची बातमी स्थानिकांना कळाली. त्यानंतर गावकऱ्यांनी ही घटना पोलिसांना कळवली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवला त्यानंतर तपासाला सुरुवात केली. त्या तपासात प्रल्हाद यांच्यावर मुलावर पोलिसांना संशय आला. त्यांनी मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला. 

Web Title: fell in love with a friend on Instagram; son killed his father who is against love marriage in palwal