स्वत:च्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 20:51 IST2018-12-28T20:51:28+5:302018-12-28T20:51:49+5:30
ज्याने जन्म दिला, त्याच वडीलाने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना मडगाव भागात उघडकीस आली आहे. पोलीस ठाण्यात या बलात्काराची रितसर तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी लागलीच कारवाई करताना त्या नराधम वडिलाच्या मुसक्या आवळल्या.

स्वत:च्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला अटक
मडगाव: ज्याने जन्म दिला, त्याच वडीलाने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना मडगाव भागात उघडकीस आली आहे. पोलीस ठाण्यात या बलात्काराची रितसर तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी लागलीच कारवाई करताना त्या नराधम वडिलाच्या मुसक्या आवळल्या. संशयित मूळ कर्नाटक राज्यातील रहिवाशी आहे. तो 37 वर्षाचा असून, अधिक तपासासाठी त्याला आज शुक्रवारी न्यायालयापुढे उभे केले असता, सात दिवसांचा पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रज्ञा जोशी पुढील तपास करीत आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 342, 323, 504, 506 (2), बाल सरंक्षण कायदा कलम 6 तसेच गोवा बाल कायदा कलम 8(2) अंर्तगत पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. पिडीत युवतीला सद्या हॉस्पिसियो इस्पितळात दाखल केले असून, तिची अजूनही वैद्यकीय तपासणी झाली नाही. सद्या मडगावच्या हॉस्पिसियोत महिला डॉक्टर नसल्याने दक्षिण गोवा जिल्हय़ातील काणकोण येथील आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टर या पिडीताची तपासणी करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्राथमिक चौकशीत सदर मुलगी तीन महिन्याची गरोदर असल्याचे आढळून आले आहे. घरातच तिच्यावर बळजबरीने बलात्कार करण्यात येत होता. या गोष्टीची वाच्यता कुठे केल्यास जीवे मारण्याचीही धमकी दिली होती असे तक्रारीत नमूद केले आहे. संशयित रोजंदारीवर गवंडी म्हणून काम करीत होता तर पिडीताची आई दुस-याकडे घरकाम करीत होती. पिडीत युवती एका विद्यालयात शिकत आहे. घरी कोणी नसताना संशयित बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील पोलीस तपास चालू आहे.