नराधम बापाचा पोटच्या मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2022 11:12 IST2022-06-19T11:08:38+5:302022-06-19T11:12:17+5:30

Father raped his daughter : पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर पीडितेने १५ जून रोजी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली.

Father raped his daughter | नराधम बापाचा पोटच्या मुलीवर अत्याचार

नराधम बापाचा पोटच्या मुलीवर अत्याचार

ठळक मुद्देमुलगी ५ महिन्यांची गर्भवती शेलू वेताळ येथील घटना

मूर्तिजापूर : वासनांध बापाने स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार करत तिला गर्भवती केल्याची पिता- पुत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना शेलू वेताळ शिवारात घडली. या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी आरोपी पित्यास अटक केली आहे.

             शेलू वेताळ येथील एका शेतात प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील कोथलकुंड येथील एक कुटुंब शेतमजुरीचे काम व शेताची राखणी करण्यासाठी शेतातील झोपडीत राहत असे. या कुटुंबातील पित्याने अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार करून तिला गर्भवती केले. याबाबत कुठे वाच्यता केल्यास पित्याकडून तिला वारंवर धमकावल्या जात होते. भीतीपोटी पीडित मुलीने तिच्यावर गुदरलेली आपबीती कोणालाही सांगितली नाही. ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर पीडितेने १५ जून रोजी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पसार झालेल्या आरोपीच्या शोधात पोलिसांनी बैतुल गाठले व त्याला १७ जून रोजी अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २१ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपीविरुद्ध पोलिसांनी कलम ३७६ व (पोक्सो) बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सत्यजित मानकर करीत आहेत.

Web Title: Father raped his daughter